शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या रंगाच्या बर्फ निर्मितीस अकोल्यातील  कारखानदारांचा खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:54 IST

अकोल्यातील कारखानदार निळ्या रंगाचा बर्फ तयार करण्यास कानाडोळा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उजेडात आले आहे.

ठळक मुद्दे औद्यागिक किंवा मृतदेहांसाठी वापरण्यात येणाºया बर्फाची पुन्हा खाद्यपदार्थांसाठी विक्री करण्यात येत असल्याचे राज्यभरात उघडकीस आले होते.आरोग्यासाठी घातक असलेला या अखाद्य बफर् ाची विक्री होऊ नये म्हणून अशा प्रकारचा बर्फ निळ्या रंगात तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बर्फ उत्पादकांनी निळ्या बर्फाची निर्मितीच सुरू केली नसल्याची माहिती लोकमतने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

- सचिन राऊत

अकोला -मृतदेहांसाठी किंवा औद्यागिक वापरासाठी लागणाºया बर्फाची खाद्य बर्फ म्हणून विक्री करण्यात येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी अखाद्य बर्फ निळ्या रंगात तयार करण्याचे आदेश दिल्यानंतरही अकोल्यातील कारखानदार निळ्या रंगाचा बर्फ तयार करण्यास कानाडोळा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उजेडात आले आहे.अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार बर्फ हे खाद्यपदार्थाच्या परिभाषेत येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यआयुक्तांनी यासाठी एक नियमावली तयार केली आहे. औद्यागिक किंवा मृतदेहांसाठी वापरण्यात येणाºया बर्फाची पुन्हा खाद्यपदार्थांसाठी विक्री करण्यात येत असल्याचे राज्यभरात उघडकीस आले होते. त्यामुळे आरोग्यासाठी घातक असलेला या अखाद्य बफर् ाची विक्री होऊ नये म्हणून अशा प्रकारचा बर्फ निळ्या रंगात तयार करण्याचे आदेश दिले आहेत, तर खाद्यासाठी वापरण्यात येत असलेला बर्फ पांढºया रंगात निर्मिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी बर्फ उत्पादकांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवानाही बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही बर्फ उत्पादकांनी निळ्या बर्फाची निर्मितीच सुरू केली नसल्याची माहिती लोकमतने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर बर्फ कारखानदारांनी अन्न व औषध विभागाच्या परवान्यासाठीही पुढाकार न घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. निळ्या रंगाची बर्फ निर्मिती न केल्यास ही शिक्षाबर्फ उत्पादकांनी औद्यागिक वापरासाठी लागणाºया निळ्या रंगाचा बर्फ उत्पादीत न केल्यास तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना न घेतल्यास बर्फ उत्पादकांना पाच लाखांचा दंड व सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही अकोल्यातील बर्फ उत्पादकांपैकी एकानेच परवान्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. तर एकाने परवाना घेतल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. 

असा झाला संवाद

एका बर्फ कारखानदारास औद्यागिक वापरासाठी लागणाºया बर्फाची मागणी केली असता, त्यांनी अशा प्रकारचा बर्फ अद्याप तयार नसून, संबंधित अधिकाºयांनी काही माहितीच दिली नसल्याचे या कारखानदारांनी सांगितले, तर पांढरा बर्फ विक्रीसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यानंतर दुसºया बर्फ कारखानदारास मृतदेह ठेवण्यासाठी बर्फाची लादी हवी असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले, यावर त्यांनी पांढºया रंगाचा बर्फ तयार असल्याचे सांगत १२०० ते १३०० रुपयांचा बर्फ लागणार असल्याचे सांगितले. ५ ते ६ रुपये प्रतिकिलोने बर्फ लागणार असल्याचेही कारखानदारांचे म्हणणे होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी