अकोला: महानगरपालिकेतील अभियंत्यांची दोन रिक्त पदे भरण्यात आली आहे. यवतमाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद राठी आणि अचलपूर येथील उपअभियंता इकबाल खान यांची अकोला महापालिकेत बदली करण्यात आली. ते सोमवार, २५ जानेवारी रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. अकोला महापालिकेतर्फे १५ कोटी रुपयांच्या निधीतून १0 हजारांपेक्षा अधिक वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम केले जात आहे. तसेच घरकुल योजनेचीही कामे केली जात आहे. या कामांमध्ये तांत्रिक अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना अनेक वेळा पत्रही पाठविले होते. अखेर दोन अभियंत्यांची अकोला मनपात बदली करण्यात आली. अचलपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता असलेले इकबाल खान आणि यवतमाळ येथील उपअभियंता प्रमोद राठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अभियंते कार्यकारी अभियंत्याचे पद स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर शौचालयांची कामे तत्काळ मार्गी लागतील.
महापालिकेला मिळाले दोन अभियंते!
By admin | Updated: January 25, 2016 02:16 IST