शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेच्या ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य’ आंदोलनाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:28 IST

अकोला: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अकोला: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे व एचटीबीटी कपाशीच्या वाणाच्या चाचण्या व प्रयोग सुरू करण्याविषयी शेतकरी संघटनेच्या अकोली जहागीर येथून सुरू झालेल्या आंदोलनाने महाराष्ट्रभर पेट घेतला आहे. या आंदोलनाचे पडसाद हरियाणातही उमटत आहेत. येत्या ५ जुलैला हरियाणामध्ये हे आंदोलन पेटण्याचे चिन्हे दिसत आहेत. भारतभर पसरत असलेल्या या आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने रस्ते व परिवहन मंत्री तसेच विदर्भाचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचे पत्र गडकरींना दिले. शिष्टमंडळाच्या भेटीत सकारात्मक चर्चा होऊन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी दिल्ली येथे चर्चा घडवून आणता येईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश शर्मा, अमरावती जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख राजाभाऊ पुसदेकर, शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर व विजय नेव्हल उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाNitin Gadkariनितीन गडकरीFarmerशेतकरी