शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नववीत अनुत्तीर्ण विध्यार्थ्यांची होणार फेर परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:39 IST

अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देनववीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा आणखी एक वर्ष त्याच वर्गात घालविल्यानंतरच दहावीत जाण्याची संधी मिळत असे.नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. असा निर्णयच शासनाने घेतल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.

अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात शाळास्तरावर घेण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.दहावीतील नापास विद्यार्थ्यांना आॅक्टोबर किंवा फेब्रुवारीत परीक्षेला बसण्याची संधी मिळते; परंतु तशी संधी नववीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नव्हती. त्यांना नववीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा आणखी एक वर्ष त्याच वर्गात घालविल्यानंतरच दहावीत जाण्याची संधी मिळत असे. त्यात विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जायचे. त्यामुळे हा विषय शिक्षण विभागाच्या विचाराधीन होता. आता त्याला शासनाने परवानगी दिली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २0१७ व १८ पासून नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. नैदानिक चाचण्यांच्या निकालावरून ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीमध्ये उत्तीर्ण होण्यास काही अडचणी असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी जलद गतीने शिक्षण पद्धतीचा वापर करून त्यांना उत्तीर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत प्रशिक्षण घेण्यात येईल. यासोबतच २0१७ व १८ मध्ये माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया इयत्ता नववीमधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केल्यानंतरही अपयश येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी, असा निर्णयच शासनाने घेतल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाeducationशैक्षणिक