बुलडाणा: निर्दयपणे जनावरांची ट्रकमधून अवैधरीत्या वाहतूक करताना गुदमरून नऊ जनावरांचा मृत्यू झाला. तर अनेक जनावरांची प्रकृती गंभीर होती. १५ मार्च रोजी बुलडाणा पोलिसांनी जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणार्या ट्रकला शहरातील मुख्य मार्गावर ताब्यात घेतले अस ता हा प्रकार उघडकीस आला. यावेळी तब्यात घेतलेल्या जनावरांना बालाजी गोरक्षण संस्था ये थे ठेवण्यात आली. बुलडाणा पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्या शहरातील संगम चौक ते जयस्तंभ चौकदरम्यान मार्गावर आज १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता एमपी ९ एचएफ ५१६९ क्रमांकाचा ताटपत्रीने झाकलेला ट्रक फेल पडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. चालकाने ट्रकला मार्गावरून दूर केले; मात्र या ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस पथक घटनास्थळी पोहचून ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये जनावरे आढळून आली, शिवाय चालक फरार होता. यानंतर सदर ट्रकला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर ताडपत्री हटविण्यात आली, तेव्हा ट्रकमधे जनावरे आढळून आली. यावेळी अनेक जनावरांचा मृत्यू झाला असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. पोलिसांनी तत्काळ ट्रक मलकापूर मार्गावर राजूर घाटात नेला. येथे काही युवकांच्या मदतीने सर्व जनावरांना ट्रकच्या बाहेर काढण्यात आले. ट्रकमध्ये गाय, बैल, गोर्हे अशी ५0 जनावरे होती. त्यापैकी नऊ जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला होता. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
नऊ जनावरांचा गुदमरून मृत्यू
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST