‘नाईस’ देणार हवामान बदलाचे संकेत; बाजरपेठेची देणार अद्ययावत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:24 PM2018-02-02T13:24:50+5:302018-02-02T13:29:06+5:30

अकोला : भारत-जर्मनी मिळून यासंबंधी प्रकल्प तयार केला असून, या विषयाचे एक ‘नाईस’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे सुरुवातीला राज्यातील ३,७८८ शेतकºयांना मोबाइलवर सल्ला दिला जाईल.

'Nice' will be a sign of climate change | ‘नाईस’ देणार हवामान बदलाचे संकेत; बाजरपेठेची देणार अद्ययावत माहिती

‘नाईस’ देणार हवामान बदलाचे संकेत; बाजरपेठेची देणार अद्ययावत माहिती

Next
ठळक मुद्देभारत-जर्मनी मिळून यासंबंधी प्रकल्प तयार केला असून, या विषयाचे एक ‘नाईस’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सुरुवातीला अमरावती, यवतमाळ, अहमदनगर, धुळे, परभणी व जालना येथे या प्रकल्पाचे काम केले जाणार.‘नाईस’ प्रकल्पाद्वारे शेतकºयांना पीक संरक्षणाची इत्थंभूत माहिती शेतकºयांना मोबाइलवर दिली जाईल.

- राजरत्न सिरसाट,
अकोला : भविष्यातील लोकसंख्येच्या गरजेनुसार अन्नसुरक्षेचे आव्हान देशापुढे असल्याने आतापासून सरकारने विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. मातीचे आरोग्य, हवामान बदलाची अचूक माहिती शेतकºयांना मिळाल्यास कमी खर्चात भरपूर उत्पादन घेण्याच्या दृष्टीने भारत-जर्मनी मिळून यासंबंधी प्रकल्प तयार केला असून, या विषयाचे एक ‘नाईस’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे सुरुवातीला राज्यातील ३,७८८ शेतकºयांना मोबाइलवर सल्ला दिला जाईल.
‘नाईस’ प्रकल्पासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत राष्टÑीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैदराबाद आणि अर्थ, सहकार व विकास मंत्रालय, जर्मनी या दोन देशांमध्ये द्विपक्षीय करार झाला. यामध्ये अन्नसुरक्षा लक्ष्यांक असल्याने शेतातील मातीवर विशेष लक्ष दिले जाईल. मातीचे संवर्धन व मातीचा सामू बघून शेतकºयांनी कोणती पिके घ्यावी, यासाठी सल्ला शेतकºयांना दिला जाईल. हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने पीक , पेरणीअगोदर हवामानाचा अचूक सल्ला मिळाल्यास शेतकºयांना तसे नियोजन करता येईल. शेतकºयांनी पिकवलेल्या शेतमालाला पूरक दर मिळावेत, यासाठीची माहिती शेतकºयांना मिळाल्यास त्यादृष्टीने शेतकरी तयारी करतील. म्हणून बाजारपेठेची अद्ययावत माहिती शेतकºयांना मोबाइलवर दिली जाणार आहे. पिकाचे संरक्षण हाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी सध्या स्वत: किंवा त्रोटक माहितीच्या आधारे पीक संरक्षण करतात, त्याचे कधी फायदे तर कधी तोटे समोर येतात; पण आता या ‘नाईस’ प्रकल्पाद्वारे शेतकºयांना पीक संरक्षणाची इत्थंभूत माहिती शेतकºयांना मोबाइलवर दिली जाईल.
येत्या खरीप हंगामापासून या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्टÑ व मध्य प्रदेशात करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठ, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना प्रशिक्षित करण्यात येत आहे, तसेच पीक रचनेची माहिती गोळा केली जात आहे. या विषयावर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना बुधवारपासून दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. सुरुवातीला अमरावती, यवतमाळ, अहमदनगर, धुळे, परभणी व जालना येथे या प्रकल्पाचे काम केले जाणार असून, ३,७८८ शेतकºयांना मोबाइलवर हा सल्ला दिला जाईल.


- जर्मनी-भारत मिळून ‘नाईस’ प्रकल्प तयार केला असून, शेतकºयांना माती, शेती, हवामान, बाजारपेठेचा अचूक सल्ला मोबाइलवर दिला जाईल.
जी. भाष्कर,प्रकल्प समन्वयक, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एक्सेटेंशन मॅनेजमेंट, हैदराबाद.

Web Title: 'Nice' will be a sign of climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.