शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्याची पोपटखेड धरणात आत्महत्या? महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 09:20 IST

अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणात 1 महिन्यापूर्वी विवाह झालेल्या पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

अकोट : अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणात 1 महिन्यापूर्वी विवाह झालेल्या पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली.

 सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड येथील धरणात अकोट येथील पटेल चौकात एका इमारतीमध्ये राहणारे  शारीक अली साजिद अली (वय 35) व त्याची पत्नी अनिका शायन शारीक अली (वय 23) हे दोघेजण 3 मार्चच्या दुपारी बाहेर जातो असे सांगून विना नंबरच्या नवीन मोटारसायकलने गाडीने गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाही. त्यांचे मोबाईल सुद्धा बंद येत असल्याने नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी त्यांची मोटरसायकल धरणाच्या बाजूला आढळून आल्याने शंका निर्माण झाली. याबाबत तात्काळ पोलिसांच्या मदतीने 3 मार्च रोजी रात्री अनिका शायान हिचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर तिचा पती शारीक अली याचा मृतदेह 4 मार्च रोजी सकाळी काढण्यात आला. पोपटखेड येथील युवकांनी रात्रभर मृतदेहाचा शोध घेतला. घटनास्थळावर पोलिसांनी महिलेची चप्पल, बूट, मोटरसायकल असे सामान आढळून आले. 

दोघा पती-पत्नीचा बुडून मृत्यू झाल्याने नेमके मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपनार हे पुढील तपास करत आहेत.