शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्यासाठी आता नवा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 20:11 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे  काम सुरू असतानाच ‘महा-ऑनलाइन’च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नवीन ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने याद्या  ‘अपलोड’ करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले.

ठळक मुद्देकर्जमाफीचे भिजत घोंगडे  आपले सरकार ऐवजी  महा-ऑनलाइनवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरु

संतोष येलकरलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे  काम सुरू असतानाच ‘महा-ऑनलाइन’च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजना (सीएसएमएसएसवाय) या नवीन ‘पोर्टल’वर पुन्हा नव्याने याद्या  ‘अपलोड’ करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार पुन्हा शेतकर्‍यांच्या  याद्या नवीन ‘पोर्टल’वर अपलोड करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात  आले. याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच असल्याने, कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले  आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या शासनाच्या  ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर ‘अपलोड ’ करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत गत महिनाभरापासून सुरू करण्यात  आले. कर्जमाफीस पात्र सर्व शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण  झाल्यानंतर, शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन ’ याद्या  बँकांना प्राप्त होतील आणि त्यानंतर शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची र क्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पृष्ठभूमीवर पात्र शेतकर्‍यांच्या  याद्या शासनाच्या ‘आपले सरकार’या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम काही  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत पूर्ण करण्यात आले, तर काही बँकांचे काम  पूर्ण होणे बाकी आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांच्या  याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शंभर टक्के  पूर्ण झाले. शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू असतानाच,  कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या ‘महाऑनलाइन’च्या ‘सीएसएमएसएसवाय’  या ‘पोर्टल’वर  पुन्हा नव्याने ‘अपलोड ’ करण्याचे निर्देश शासनाच्या महा-आयटी  विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत  बँकांना देण्यात आले. त्यानुसार पुन्हा नव्याने नवीन ‘पोर्टल’वर कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड ’ करण्याचे काम १५ नोव्हेंबरपासून बँकांमार्फत सुरू   करण्यात आले. शेतकर्‍यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याचे घोंगडे भिजतच  असल्याने, कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष  लाभ मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवीन ‘पोर्टल’वर याद्या ‘अपलोड’ करण्यातही अडचणी !शासनाच्या ‘महा-आयटी ’ विभागाच्या निर्देशानुसार कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांच्या याद्या ‘महा-ऑनलाइन’च्या ‘सीएसएमएसएसवाय ’ या नवीन ‘ पोर्टल’वर नव्याने ‘अपलोड ’ करण्याचे काम  १५ नोव्हेंबरपासून अकोला जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू करण्यात आले; मात्र शेतकर्‍यांच्या याद्या नवीन  ‘पोर्टल’वर ‘अपलोड ’ करण्यातही अडचणी येत आहेत. ‘नेट कनेक्टिव्हिटी  ’अभावी ‘एरर’ येत असल्याने शेतकर्‍यांच्या याद्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्या त विलंब होत आहे, त्यामुळे कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या नवीन ‘पोर्टल’वर  ‘अपलोड’ करण्याचे काम पूर्ण केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.- 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार