शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक वाद विकोपाला, मामाच्या चाकुहल्ल्यात भाच्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 19:23 IST

Crime News : मामाने भाचाच्या छातीत चाकू भोसकल्याने भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान मेघराज प्लॉट येथे घडली. 

कुरुम : पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुरुम येथे घरगुती वादातून मामाने भाचाच्या छातीत चाकू भोसकल्याने भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान मेघराज प्लॉट येथे घडली. 

           प्राप्त माहितीवरून स्थानिक मेघराज प्लॉट येथे आरोपी सै.वारीस सै. अहमद व मृतक शेख फारुख शेख अहमद हे दोघेही आपल्या पत्नी व मुलांसोबत दोन खोल्याच्या एकाच घरात वेगवेगळे राहत होते.यावेळी आरोपी सै.वारीस सै. अहमद याचा मुलगा पलंगावरुन खाली पडल्याने आरोपीने  शेख फारुख शेख अहमद याला तुझ्या मुलाच्या आवाजाने माझा मुलगा हा पलंगावरुन खाली पडला असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.  मामा सै.वारीस सै. अहमद याने भाचा  शेख फारुख शेख अहमद याच्यावर चाकूने हल्ला केला. शेख फारुख शेख अहमद याच्या छातीत चाकू लागल्याने त्याला जखमी अवस्थेत स्थानिक प्रा. आ. केंद्र कुरुम येथे हलवले व तेथून अमरावती येथील इर्विन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तिथे डॉक्टरांनी शेख फारुख शेख अहमद यास तपासणी अंती मृत घोषित केले.    यावेळी घटनास्थळी मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत,माना पो.स्टे.प्रभारी ठाणेदार राहुल देवकर,उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांचेसह एएसआय दिलीप नागोलकर,हे.कॉ.तेजराव तायडे, ना.पो.कॉ.नंदकिशोर टिकार,पो.कॉ. राजेश डोंगरे,पंकज वाघमारे यांनी भेट दिली असून कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी