शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ना सावली ना पाणी, उन्हातच बियाण्याची विक्री; शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा

By संतोष येलकर | Updated: May 26, 2024 17:02 IST

बीटी कपाशीच्या एका वाणासाठी केंद्रांवर लागल्या शेतकऱ्यांच्या रांगा

अकोला: मागणीच्या तुलनेत बीटी कपाशीच्या एका वाणाचा पुरवठा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर या वाणाच्या बियाण्यासाठी रविवारी शहरातील बियाणे विक्री केंद्रांवर भर उन्हातच शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. तापत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका असताना सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता उन्हातच शेतकऱ्यांना संबंधित वाणाच्या बियाण्याची विक्री करण्यात आली.

उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता, जिल्हयात येत्या ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी २५ मे रोजी दिला. परंतू शहरातील बियाणे विक्री केंद्रांच्या परिसरात उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली, पिण्याचे पाणी आदी उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे २६ मे रोजी अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हातच दुपारपर्यंत बियाणे विक्री केंद्रांसमोर रांगेत उभे राहून शेतकऱ्यांना संबंधित वाणाच्या बियाण्याची खरेदी करावी लागल्याचे दिसत होते.

रांगेतील शेतकऱ्यांना कुपन देवून प्रत्येकी तीन पाकीटे बियाण्याची विक्री !बीटी कपाशीच्या एका विशिष्ट वाणाचे बियाणे खरेदी करण्यासाठी रविवारी अकोला शहरातील बियाणे विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. रांगेतील शेतकऱ्यांना कुपन देवून संबंधित वाणाच्या प्रत्येकी तीन पाकीटे बियाण्याची विक्री करण्यात आली. शनिवारपर्यत जिल्हयात शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन पाकीटे बियाण्याची विक्री करण्यात येत होती. रविवारपासून संबंधित वाणाच्या तीन पाकीटे बियाण्याची विक्री सुरु करण्यात आली. अशी माहिती कृषी विकास अधिकारी मिलींद जंजाळ यांनी दिली.

पहिल्याच दिवशी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा!उष्माघाताचा धोका लक्षात घेता, कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दिला.मात्र बियाणे खरेदीसाठी शहरातील बियाणे विक्री केंद्रांच्या परिसरात रविवारी भर उन्हात शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागल्याने, पहिल्याच दिवशी प्रतिबंधात्मक उपायोजनांकडे कानाडोळा करण्यात आल्याचे चित्र दिसत होते.

बियाणे निरीक्षक, पोलीस बंदोबस्तात विक्री !बीटी कपाशी संबंधित वाणाच्या अकोला शहरातील पाच विक्रेत्यांकडे कृषी विभागाचे पाच बियाणे निरीक्षक, महसूल विभागाच्या पाच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोस्तात बियाण्याची विक्री करण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी