शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

शेतकऱ्यांच्या  हितासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज! -  संजय खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 18:47 IST

अकोला: शेतकरी व कृषिक्षेत्राच्या विकासासाठी शासन अनेक विकास योजना कार्यान्वित करीत असताना त्यांना सामाजिक संस्थांनीही हातभार लावणे गरजेचे आहे. ग्रॅँड मराठा फाऊंडेशन या दृष्टीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असून इतर संस्थांनी त्यांचा कित्ता गिरवून सामाजिक दायित्व पूर्ण करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी केले.

ठळक मुद्देग्रॅँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी चांदुर येथे किसान दिवस शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. चांदुर ,कळंबेश्वर,खरप ,सुकळी,म्हैसपूरच्या सरपंच यांना मान्यवरांच्या हस्ते माती परीक्षण यंत्र ,फवारणी किट व कास्तकारीत वापरता येणाऱ्या  बॅटऱ्यांचे वितरण करण्यात आले.परिसरातील शेकडो शेतकरी ,विद्यार्थी व फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

अकोला: शेतकरी व कृषिक्षेत्राच्या विकासासाठी शासन अनेक विकास योजना कार्यान्वित करीत असताना त्यांना सामाजिक संस्थांनीही हातभार लावणे गरजेचे आहे. ग्रॅँड मराठा फाऊंडेशन या दृष्टीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असून इतर संस्थांनी त्यांचा कित्ता गिरवून सामाजिक दायित्व पूर्ण करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी केले.ग्रॅँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी चांदुर येथे किसान दिवस शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी या मेळाव्यात पाच गावातील गरजवंत शेतकऱ्यांना शेतीविषयक साहीत्याचे वाटप करण्यात आले .या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचाालक डॉ. विलास खर्चे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले, प्रभात किड्सचे संचालक डॉ.गजानन नारे,लोकजागर मंचेचे अध्यक्ष अनिल गावंडे, कृषी विज्ञान केंद्राचे निवृत्ती पाटील, कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री,कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.प्रशांत नेमाडे, डॉ.नितीन कोंडे, ग्रॅँड मराठा फाऊंडेशनच्या श्रध्दा सोनावणे,चांदूरच्या सरपंच उर्मिलाताई अढाऊ, उपसरपंच चंद्रकांत माहोरे, सुकळी सरपंच रंजनाताई जाधव, खरपचे सरपंच सुनिल पाटील, म्हेैसपुरच्या सरपंच सविताताई इंगळे,कळंबेश्वरचे सरपंच अनिल पाटील,अनिल माहोरे,स्पार्क इंडियाचे बर्नार्ड रिबेरो आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चांदुर ,कळंबेश्वर,खरप ,सुकळी,म्हैसपूरच्या सरपंच यांना मान्यवरांच्या हस्ते माती परीक्षण यंत्र ,फवारणी किट व कास्तकारीत वापरता येणाऱ्या  बॅटऱ्यांचे वितरण करण्यात आले. प्रस्तुत माती परीक्षण यंत्र हे ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात आले असून कास्तकरानी आपल्या शेतजमिनीची प्रतवारी तपासून घेण्यासाठी या उपकरणाचा मोफत लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात येऊन या यंत्रांची माहिती उपस्थित शेतकºयांना देण्यात आली.यावेळी फाउंडेशनच्या वतीने मान्यवर व सरपंचांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आलीत. संचालन व आभार सचिन निंधाने यांनी केले. यावेळी माजी जी प सभापती लखूअप्पा लंगोटे , देवेंद्र इंगळे, देविदास बोदडे , स्वप्नील भगत, वैभव माहोरे यांच्यासह चांदुर,म्हैसपूर ,कळंबेश्वर,खरप,सुकळी परिसरातील शेकडो शेतकरी ,विद्यार्थी व फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी