विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज- पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:20 AM2021-09-26T04:20:46+5:302021-09-26T04:20:46+5:30

जिल्हा मुख्याध्यापक संघ अकोला, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कूल ...

Need to inculcate scientific attitude in students- Patekar | विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज- पाटेकर

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज- पाटेकर

Next

जिल्हा मुख्याध्यापक संघ अकोला, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अकोला येथे गुरुवारी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहविचार सभेमध्ये विज्ञान विषयक विविध उपक्रम यामध्ये इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनी तसेच इन्स्पायर अवाॅर्ड नॉमिनेशन व विज्ञान दिनदर्शिका याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी अकोला एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव प्रा. श्रीकृष्ण अमरावतीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी निरंतर दिलीप तायडे, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, कार्याध्यक्ष विजय ठोकळ, सर्जेराव देशमुख, दिलीप कडू, कल्पना धोत्रे , प्राचार्य माधव मुन्शी आदी होते.

सहविचार सभेच्या दुसऱ्या सत्रामध्ये शशिकांत बांगर व सुरेश बाविस्कर यांनी इन्स्पायर अवाॅर्ड नामांकन ऑनलाइन कसे करायचे व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कशाप्रकारे दूर कराव्या या संदर्भात मार्गदर्शन केले. सभेचे आयोजन यशस्वी होण्यासाठी न्यू इंग्लिश उपप्राचार्य विज्ञान रेलकर, सचिन ताडे, मंजुश्री लव्हाळे, रसिका जयस्वाल विज्ञान मंडळाचे पदाधिकारी देवानंद मुसळे, अनिल जोशी, ओरा चक्रे, रामेश्वर धर्मे, एस. आर. निखाडे, श्रीकांत रत्नपारखी, विजय पजई ,सुरेश किरतकर, विश्वास जढाळ, सुनील वावगे, धम्मदीप इंगळे, विनोद देवके, संतोष जाधव, मनीष निखाडे, रेखा सानप, वंदना उमरकर, सोनिया फिलिप्स, सविता पवार, रेवती अयाचित, कीर्ती देशमुख, शुभांगी कुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन किरण राठोड यांनी केले. आभार अंजली दंडे यांनी मानले.

फोटो: २५ एकेएल मेल फोटो: इओ नावाने

Web Title: Need to inculcate scientific attitude in students- Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.