शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या भावासाठी प्रयत्नांची गरज - माजी कुलगुरू डॉ. पुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:40 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देराज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्‍यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. महाराष्ट्र तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी देशात ओळखला जात आहे. ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी शेतकर्‍यांच्या मालास भाववाढ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी यांनी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. अमित झनक, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, डॉ. डी.एम. मानकर, डॉ. महेंद्र नागदेवे, प्रा. डॉ. डी.बी. उंदीरवाडे, नियंत्रक विद्या पवार, डॉ. प्रमोद वाकडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, प्रगतिशील शेतकरी आप्पाजी गुंजकर, कमलकिशोर धीर आदी होते. माजी कुलगुरू डॉ. पुरी म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशाला दोन मोठय़ा देणग्या दिल्या. स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन दिल्ली येथे घेतलं. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. शेतकर्‍यांच्या विकासासाठी ते झटले; परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे असूनही शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यावर समाधान शोधण्याची गरज आहे. प्रगल्भ तंत्रज्ञान, सोईसुविधा आहेत. उत्पादनवाढीसाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध आहे; परंतु शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी प्रगती करू शकत नाही. यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करून शेतमालाला भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, असे सांगत, डॉ. पुरी म्हणाले, बीटी कॉटन आल्यावर बघण्याचा दृष्टिकोन बदलला; परंतु येथेच आमची फसवणूक झाली. याविषयीचे चिंतन कृषी विद्यापीठांनी करायला हवे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी.एम. मानकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. प्रदीप बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. 

पीक संरक्षण, यांत्रिकीकरणावर भर - डॉ. भालेशेतकर्‍यांचा विकास हा कृषी विद्यापीठाचा ध्यास आहे. कृषी विद्यापीठाने पीक संरक्षण, सेंद्रिय शेती आणि यांत्रिकीकरणावर अधिक भर दिला आहे. शेतकर्‍यांना फायदेशीर ठरेल, असे नवनवीन कृषी तंत्रज्ञान, बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ