शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये होणार फेरबदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:56 IST

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभरातील जिल्हा कार्यकारिणींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी २२ एप्रिल रोजी निवडणूक. विरोधी पक्षांकडून झालेली आंदोलने सरकारवर फारसा प्रभाव टाकू शकली नसल्याचे चित्र निर्माण झाले.

- आशिष गावंडेअकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभरातील जिल्हा कार्यकारिणींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केला जाणार आहे. पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून येत्या २२ एप्रिल रोजी जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडणार असून, २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आयोजित सर्वसाधारण सभेत प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आगामी जिल्हा परिषद, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षांतर्गत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.शेतकºयांच्या उत्पादित शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने सातत्याने आंदोलनांचा बिगुल फुंकल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नाफेडद्वारे तूर, सोयाबीनची खरेदी प्रक्रिया असो वा अपुऱ्या बारदान्याअभावी शेतमालाच्या होणाºया नासाडीवरून शिवसेनेने प्रशासकीय यंत्रणेसह शासनाला धारेवर धरल्याचे दिसून आले. अर्थातच, ही जबाबदारी विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची असली, तरी या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी बदललेल्या सावध भूमिकेमुळे सेनेचे फावले. विरोधी पक्षांकडून झालेली आंदोलने सरकारवर फारसा प्रभाव टाकू शकली नसल्याचे चित्र निर्माण झाले. पक्षात आलेली मरगळदेखील याचे मुख्य कारण मानल्या जाते. अशा स्थितीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतल्याचे दिसत आहे. त्या पृष्ठभूमीवर २२ एप्रिल रोजी पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाºयांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टातराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची दोन वेळा संधी मिळाली. त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २९ एप्रिल रोजी पुणे येथे आयोजित सर्वसाधारण सभेत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.पक्षाच्या ध्येय-धोरणांमध्ये बदल?राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या मुद्यावर भाजपाने राष्ट्रवादीला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षाने आजवर घेतलेल्या सावध पवित्र्यावर पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या ध्येय-धोरणांमध्ये बदल करण्यासह आगामी दिवसांतील रणनीती आखण्यावर भर दिला जाणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार