शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राष्ट्रसंतांचा ४९ वा पुण्यस्मरण कार्यक्रम आजपासून अकोल्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:49 IST

अकोला : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत कार्य करणार्‍या सेवा समितीच्यावतीने स्थानिक स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २३  ते  २५ डिसेंबरदरम्यान ४९ वा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात विविध सत्र होणार असल्याची माहिती तुकडोजी महाराज सेवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेतून दिली.

ठळक मुद्देतीन दिवसीय कार्यक्रमासाठी स्वराज्य भवन सज्ज आयोजकांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत कार्य करणार्‍या सेवा समितीच्यावतीने स्थानिक स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २३  ते  २५ डिसेंबरदरम्यान ४९ वा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात विविध सत्र होणार असल्याची माहिती तुकडोजी महाराज सेवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेतून दिली.२३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३0 वाजता हभप रामराव तिमांडे यांच्या नेतृत्वात सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ९ ते ११.३0 पर्यंत शहरातून ग्रंथ मिरवणूक काढली जाणार आहे. या शोभायात्रेचे पालखी पूजन आमदार गोवर्धन शर्मा, दादासाहेब देशपांडे, मदन भरगड, विजय देशमुख, सोपान महाराज, डॉ.अशेक ओळंबे, सोनू बाप्पू देशमुख यांच्या उपस्थित होणार आहे. दुपारी १२ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दनपंत बोथे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय धोत्रे,  हरिभाऊ वेरूळकर, सुधाकर गणगणे, गुलाबराव गावंडे, बबनराव चौधरी, अँड. मोतीसिंह मोहता, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. अभय पाटील, अशोक अमानकर, आमले महाराज, विलास अनासने, महादेवराव भुईभार, शिवप्रकाश रूहाटिया, बाळासाहेब आपोतीकर, किशोर वाघ, बलदेव पाटील, उज्‍जवला देशमुख, शिरीष धोत्रे, डॉ.सुभाष भडांगे, डॉ.संतोष हुसे, राजू वर्मा,अँड.रामसिंह राजपूत, गुलाब महाराज, जगदीश मुरु मकार, कृष्णाभाऊ अंधारे, भानुदास कराळे प्रामुख्याने उपस्थित  राहणार आहेत. कार्यगौरवाने राधेश्याम चांडक यांना तर सत्कारमूर्तीने अँड.संतोष भोरे यांना येथे सन्मानित करण्यात येईल. दुपारी २ वाजता भजन संमेलन,  सायंकाळी ६ वाजता गोवर्धन खवले यांच्या नेतृत्वात सामूहिक प्रार्थना होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता दीपक सावळे यांचे, तर रात्री ८ वाजता प्रकाश मांगे यांचे राष्ट्रीय कीर्तन होणार आहे. २४ डिसेंबर रोजी पहाटे ५.३0 वाजेपासून डॉ.अजय उपाध्याय यांच्या पुढाकारात ध्यान-चिंतन होईल. डॉ.आर.जे.सावनकार यांच्या नेतृत्वात योगासन प्रात्यक्षिक होतील. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत भजन संमेलन,  दुपारी १ ते ३ वा.दरम्यान डॉ.स्मिता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलन  होईल. ‘महिलांची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी’ यापरिसंवादात भाग्यश्री देशमुख, सुधाताई जवंजाळ, अँड.श्रद्धा आखरे, डॉ.पूजा सपकाळ, शैलजा गावंडे, मंगला पांडे, साक्षी पवार, ममता इंगोले, चैताली खांबलकर सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता महाराष्ट्रातील संत परंपरेवर उत्तम स्वामी भाष्य करतील. दुपारी ३.३0 वाजता ‘मी राष्ट्रसंत बोलतोय!’ यावर ११ वर्षीय सर्मथ गावंडेचा एकपात्री प्रयोग होईल. सायंकाळी ४.३0 वाजता मनोहर  रेचे यांचे ग्रामगीता प्रवचन होईल. सायंकाळी साडेपाच वाजता राजशे खवले व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता अँड. संतोष भोरे यांच्या नेतृत्वात सामूहिक प्रार्थना, सायंकाळी ७ वाजता प्रा. घननीळ पाटील यांचे शास्त्रीय अभंग गायन रात्री ८ वाजता गुलाबराव महाराज यांचे राष्ट्रीय कीर्तन होणार आहे. समारोपीय कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी पहाटे गोवर्धन खवले यांच्या नेतृत्वात ध्यान, त्यानंतर राजू राऊत यांचे योग प्रात्यक्षिक,  सकाळी ८ ते १२ पर्यंत भजन संमेलन, दुपारी १२ ते २ पर्यंत शेतकरी संमेलन, अध्यक्षस्थानी विजय जावंधीया राहणार असून यावेळी डॉ.शरद निंबाळकर, प्रकाश मानकर, रमेश मंडाले, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे, मनोज तायडे, ज्ञानेश्‍वर सुलताने, मधुकर सरप, कपिल  ढोके सहभागी होणार आहेत. दुपारी २ वाजता श्रीकृष्ण सावळे यांचे राष्ट्रीय कीर्तन होईल. त्यानंतर ४ वाजता मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता भजन, त्यानंतर विलास साबळे आणि लक्ष्मण काळे यांचे राष्ट्रीय कीर्तन होईल.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkola cityअकोला शहर