शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधीक्षक कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसने केली निकृष्ट सोयाबीन बियाण्यांची पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी दुपारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देत, कार्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरने निकृष्ट सोयाबीन बियाण्यांची लागवड केली.

अकोला : जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांची लागवड केली; परंतु बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे शेतजमिनीत उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसह आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागला. निकृष्ट बियाणे प्रकरणात कंपन्यांवर फौजदारी करण्यासह शेतकºयांना बियाण्यांसह आर्थिक नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी दुपारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देत, कार्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरने निकृष्ट सोयाबीन बियाण्यांची लागवड केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी अधीक्षक अधिकारी  मोहन वाघ  यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये जिल्ह्यात यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु यावर्षी हजारो शेतकºयांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे बियाण्यांच्या खर्चासह खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च वाया गेला. ज्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही, त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तसेच पीक विमा शेतकºयांना मिळाला नाही. तो तातडीने देण्यात यावा, नुकसान झालेल्या शेतकºयांना बियाण्यांच्या खर्चाची नव्हे तर खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च यासह त्याच्या उत्पादनाचे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी. अन्यथा रुमणे मारो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव म्हैसने, सरचिटणीस परिमल लहाने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन