शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीच्या मुलींनी सांभाळली गजबजलेली वाहतुक व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 14:47 IST

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी अभिनव प्रयोग राबवित त्यांना सहकार्य केले.

अकोला : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शहरातील गजबलेल्या वाहतुक व्यवस्थेची जबाबदारी एनसीसीच्या मुलींनी रविवारी सांभाळली. तर वाहतुक पोलिस निरीक्षक यांची जबाबदारी प्रा. श्वेता मेंढे यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी अभिनव प्रयोग राबवित त्यांना सहकार्य केले.मुलीं आणि महिला कोणत्याही क्षेत्रात आव्हानात्मक काम करू शकतात हा विश्वास जागविण्यासाठी तसेच वाहतूक पोलिसांची ड्युटी किती कष्टाची व कठीण आहे हे मुलींना समजावे व त्या अनुषणगाने पोलिसां विषयी व त्यांचे कामाप्रति त्यांचे मनात आदराची भावना वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने एनसीसीच्या ६० मुलींनी रविवारी जागतीक महिला दिनानीमीत्त वाहतुक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांनी बेशीस्त वाहनचालकांना अडवून त्यांचे दस्तावेत तपासणी करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली. एक सामान्य नागरिक म्हणून वाहतूक नियमाची माहिती होऊन वाहतूक नियम पाळण्याची जाणीव त्यांचे मध्ये निर्माण व्हावी म्हणून एनसीसीच्या ६० मुलींनी त्यांच्या शिक्षकांसह सकाळी 9 वाजता शहर वाहतूक विभागाचे कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन वाहतूक पोलिसांच्या कामकाज विषयी शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी माहिती दिली. शहरातील प्रदूषणामुळे मुलींना मास्कचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नेहरूपार्क चौक, हुतात्मा, भगत सिंग, धिंग्रा, अशोक वाटिका, सिव्हिल लाईन, रतनलाल प्लॉट, पोस्ट आॅफिस, टॉवर 'ा महत्वाच्या चौकातील वाहतूक पोलीस सोबत त्यांनी वाहतुक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. 

स्पीडगन कारची घेतली माहितीवाहतूक शाखेला प्राप्त नवीन इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगण कसे काम करते ह्या विषयी महिला शिक्षकांना व मुलींना माहिती करून देण्यात आली. लेफ्टनंट पदावर असलेल्या आर डी जी महिला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक श्वेता मेंढे ह्यांना वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून प्रभार देऊन कामकाजा विषयी माहिती दण्यात आली. यावेळी प्रा डॉक्टर अश्विनी बलोटे, अर्चना रंजनकर यांची उपस्थिती होती. यांचा होता सहभागया उपक्रमात शिवाजी महाविद्यालय,आर डी जी महाविद्यालय, डी आर पाटील विद्यालयील श्रीकांत रत्नपारखी, नंदकिशोर थोटे, अशोक नांदूरकर या शिक्षकांनी सहकार्य केले. जागतिक महिला दिनी प्रत्यक्ष पोलिसांच्या कामात सहभागी करून घेतल्या बद्दल सर्व मुलींनी समाधान व्यक्त करून पोलीस प्रशासनास धन्यवाद दिले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसAkolaअकोला