अकोला : नवोदय विद्यालयातील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ सुरू असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, तेथील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेविषयी पालकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक पालक गुरुवारी मुलींना घरी घेऊन गेले. नवोदय विद्यालयात पालकांनी गुरुवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. ते आपआपल्या पाल्यांना घरी घेऊन जात होते. यावेळी जमलेल्या पालकांनी एकमेकांशी चर्चा केली. मुलींचा प्रवेश शाळेत राहू द्यायचा की त्यांना शिक्षणासाठी दुसर्या शाळेत प्रवेश घ्यायचा, हा चर्चेचा सूर होता. किमान प्रकरण निपटेपर्यंत मुलींना शाळेत ठेवण्यात अर्थ नाही, यावर बहुतांश पालकांचे एकमत झाले आणि जवळपास ५0 टक्के पालकांनी आप-आपल्या मुलींना घरी नेणे पसंत केले. दरम्यान, दोन्ही आरोपी शिक्षकांनी सुटीचा अर्ज दिला आहे, मात्र अद्याप त्यांची रजा मंजूर झाली नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी शाळेला भेट देऊन पालकांशी चर्चा केली. या प्रकरणामध्ये मनसे पालकांच्या पाठिशी उभी राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. दोषी शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली.
‘नवोदय’च्या मुलींची घरवापसी!
By admin | Updated: April 3, 2015 02:33 IST