शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अकोल्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 15:48 IST

अकोला : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी अकोला येथील मुख्य डाक घरासमोरच्या चौकात निदर्शने करून राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देया वक्तव्याबाबत मोहन भागवत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच संघावर बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश सरप पाटील यांच्या नेतृत्वात स्वराज्य भवन येथून रॅली काढून मुख्य डाकघरासमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देशाची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अकोला : राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याशी करून एक प्रकारे भारतीय सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी अकोला येथील मुख्य डाक घरासमोरच्या चौकात निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.भारतीय सैनिक हे जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र संघाच्या कार्यकर्त्यांची तुलना भारतीय सैन्यासोबत केली आहे. हा भारतीय सैनिकांचा एक प्रकारे अपमान असून, या वक्तव्याबाबत मोहन भागवत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच संघावर बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश सरप पाटील यांच्या नेतृत्वात स्वराज्य भवन येथून रॅली काढून मुख्य डाकघरासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, बुढन गाडेकर, डॉ. अनंतकुमार मानकर, बाळासाहेब तायडे, आशिष सावळे, अशोक लाड, शौकत अली शौकत, सचिन लहाळे, देवेंद्र शिरसाठ, आशिष वानखडे, शैलेश बोदडे, अमर डिकाव, नितीन देशमुख, महिला कार्याध्यक्ष भारती निम, महादेवराव बोर्डे, शेखर सरप पाटील, माजी महानगर अध्यक्ष अजय तापडीया, मनोज तिवारी, डॉ. गणेश महल्ले, दत्तात्रय महल्ले, गजानन सिरसाट, विजयकुमार ताले, गोपाल चतरकार, सुधिर ताले, पुरुषोत्तम ताले, श्रीमंत जवादे, अजय डाबेराव, प्रताप सोळंके, विठ्ठल सोळंके, मयूर दुरबळे, रवी गिते, गोविंद पांडे, संदिप तायडे, प्रकाश मोरे, संतोष अवचार, अंकुश धुमाळे, जीवन मोडक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMohan Bhagwatमोहन भागवत