शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:19 IST

अकोला - निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे.कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली.

अकोला - केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर वर्षाला दोन कोटी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते, प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चार वर्षात तब्बल ८ कोटी बेरोजगारांना नोकरी देणे अपेक्षित होते मात्र केवळ पाच लाख नोकºया देण्यात आलेल्या आहे. त्यामूळे या निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार युवकांचा मोर्चा धडकणार आहे. देशातील केवळ पाच लाख युवकांना नोकºया देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी कबुल केले आहे. यासोबतच नोटबंदीमुळे हजारो युवकांचे रोजगार गेले असून छोटे उद्योग व व्यवसाय बंद पडले आहेत. कौशल्य विकास योजना कार्यान्वीत केली मात्र अद्याप एकाही बेरोजगार युवकाला नोकरी देण्यात आली नसल्याचा आरोप संग्राम गावंडे यांनी केला. या योजनेत राज्यात सात हजार २५२ प्रशिक्षण संस्थाना सरकारने एक छदामही दिला नाही. त्यामूळे या ठिकाणी काम करणारे तब्बल ५५ हजार नोकरदार बेरोजगार झाले आहेत. डी. एड. बी. एड झालेल्या उमेदवारांना नोकरी नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दरवर्षी ४५० ते ५०० जागा भरल्या जायचा मात्र यावर्षी केवळ ५९ जागांची जाहीरात काढण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद पडल्यात जमा आहे. मॅनेजमेंट कोटयामध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. एक नव्हे तर शेकडो समस्या या सरकारने उभ्या केल्या असून या विरोधात युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संग्राम गावंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश सरप पाटील, पंकज गावंडे, मनोज तिवारी, विजय ताले, विपुल घोगरे, बुढन गाडेकर, अमर डिकाव, देवेंद्र शिरसाट, शैलेष बोदडे, डॉ. अनंत मानकर, गोपाल चतरकर उपस्थित होते. 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय