समारोपीय कार्यक्रमात नायब तहसीलदार चैताली यादव, जि. प. सदस्य गायत्री कांबे, एल. डी. सरोदे, कमलताई वानखडे, योगिता वानखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास वानखडे यांनी केले. व्याख्याता चैताली यादव यांनी मार्गदर्शन केले. मिलिंद इंगळे, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, दिनेश श्रीवास, शिवा सुखसोहळे, सीमा ढीसाळे, साक्षी तायडे यांचा सत्कार करण्यात आला. या सप्ताहामध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली. राष्ट्रीय युवा सप्ताह उपक्रमात प्रा. मनीषा यादव, प्रा. पापळकर, प्रा. कंकाळे, प्रा. ढवळे, प्रा. राजपूत, जितू सिरसाट, प्रा. मेहंदी हुसेन, प्रा. अली, संदीप संगेले, अनुष्का सिरसाट, रवी खिराडे, देवराव वानखडे आदीनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी तायडे यांनी केले, तर आभार विलास वानखडे यांनी मानले.
मूर्तिजापुरात युवकांचा गौरव करून राष्ट्रीय युवा सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST