जागतिक पोषण, आहार सप्ताहांतर्गत राष्ट्रीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST2021-09-11T04:20:42+5:302021-09-11T04:20:42+5:30

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले हे होते. राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटक म्हणून डॉ. मनीषा व्यास, गृह-अर्थशास्त्र विभाग ...

National Webinar on Global Nutrition, Diet Weekly | जागतिक पोषण, आहार सप्ताहांतर्गत राष्ट्रीय वेबिनार

जागतिक पोषण, आहार सप्ताहांतर्गत राष्ट्रीय वेबिनार

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले हे होते. राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटक म्हणून डॉ. मनीषा व्यास, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख एसपीटीएम महाविद्यालय सुरत, गुजरात उपस्थित होत्या, प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. सुजाता सबाने, गृह-अर्थशास्त्र विभाग प्रमुख, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती, डॉ. संजीवनी बिहाडे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ तेल्हारा उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. उदय देशमुख, महाविद्यालय विकास समिती सदस्य, सुधीर देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय वेबिनारच्या समन्वयक प्रा.सुषमा फरसोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा माहुरे यांनी केले तर आभार प्रा. दीपाली भुईभार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगेश देवतळे, सचिन ढोले यांनी परिश्रम घेतले.

Web Title: National Webinar on Global Nutrition, Diet Weekly