शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुलींचा जोरदार ठोसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:17 IST

अकोला: महाराष्ट्राच्या मुलींनी ६३ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग(१९ वर्षाआतील मुले-मुली) स्पर्धेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सोमवारी स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी मुलींच्या गटातील उपान्त्यपूर्व फेरीतील लढती झाल्या. रोमहर्षक व उत्कंठावर्धक झालेल्या या लढतींमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कडवी झूंज देवून उपान्त्यफेरीत प्रवेश निश्‍चित केला.

ठळक मुद्देगौरी, साक्षी, संस्कृती, यशश्री, अलिया, दिया उपान्त्य फेरीत

नीलिमा शिंगणे-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्राच्या मुलींनी ६३ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग(१९ वर्षाआतील मुले-मुली) स्पर्धेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सोमवारी स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी मुलींच्या गटातील उपान्त्यपूर्व फेरीतील लढती झाल्या. रोमहर्षक व उत्कंठावर्धक झालेल्या या लढतींमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कडवी झूंज देवून उपान्त्यफेरीत प्रवेश निश्‍चित केला.सायंकाळच्या सत्रात ६६ किलो वजनगटात गोव्याची मुस्कान आणि महाराष्ट्राची अलिशा नाईकवाडे यांच्यात लढत झाली. कोल्हापूरच्या अलिशाने ही लढत ३-0 अशी गुणांच्या आधारावर जिंकली. ७५ किलो वजनगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत अकोल्याच्या साक्षी गायधने हिने हरियाणाच्या मेघाला ५-0 ने धूळ चारली.  सकाळच्या सत्रात ४२ ते ४५ किलो वजनगटात अकोल्याची गौरी जयसिंगपुरे, ४५ ते ४८ किलो वजनगटात सातार्‍याची यशश्री धनवाडे, ५७ ते ६0 किलो वजनगटात पुण्याची संस्कृती सुर्वे आणि अकोल्याची दिया बचे यांनी विजय मिळवून उपान्त्यफेरी गाठली.दरम्यान, मुलांच्या गटात झालेल्या लढतींमध्ये ८१ किलो वजनगटात चंदीगडच्या नवज्योत याला महाराष्ट्राच्या ऋषभने धराशाही केले. तर ९१ किलो वजनगटात अकोल्याच्या रोहण टांक याने आयपीएससीच्या अजयचा पराभव केला; मात्र महाराष्ट्राचा स्टार खेळाडू राष्ट्रीय पदक विजेता अजहर अली याला आज पराभवाचा सामना करावा लागला. अजहरकडून महाराष्ट्राला पदकाची आशा होती. ९१ किलोच्या वर वजनगटात महाराष्ट्राच्या मोन्टीने केंद्रीय विद्यालय संघटनच्या ऋषिकेशकडून पराभव स्वीकारला. महाराष्ट्राच्या अजय पेंदोर, राहिल सिद्धीकी, जिब्रान खान, साकीब पठाण, रोहण टांक यांच्याकडून सुवर्ण पदकांची अपेक्षा आहे.मुलांच्या गटात उपान्त्यपूर्व फेरीत चंदीगडचा विशाल, उत्तराखंडचा कुणाल, आयपीएससीचा सौरभ, सीबीएससीचा जगमोहन, हिमाचल प्रदेशचा आशिष, पंजाबचा करणवीर, हरियाणाचा नवीन यांनी विजय मिळविला. मुलींच्या गटात हरियाणाची अमृता, मध्यप्रदेशची कुसुमलता, गोव्याची अनिषा, हिमाचल प्रदेशची मेनका, तामिळनाडूची ऐश्‍वर्या, पंजाबची नंदिनी यांनी लढत जिंकली. 

टॅग्स :boxingबॉक्सिंगAkola cityअकोला शहरVasant Desai Stadiumवसंत देसाई क्रीडांगण