शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविल्याने महानगरातील सर्व्हिस मार्गाचा पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:06 IST

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविण्याचा निर्णय घेतल्याने, महानगरातील १२ मीटर रूंदीचा सर्व्हिस रोडचा पेच निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी ओव्हरलॅप  होणार असल्याने अपघातावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. 

ठळक मुद्देशहरातून जाणारा सर्व्हिस मार्ग अनेक ठिकाणी होणार ओव्हरलॅपअपघातावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार

संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविण्याचा निर्णय घेतल्याने, महानगरातील १२ मीटर रूंदीचा सर्व्हिस रोडचा पेच निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी ओव्हरलॅप  होणार असल्याने अपघातावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. 

अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वी महामार्गालगत ले-आऊट करताना ४५ मीटर चौपदरीकरणाची रूंदी आणि १२ मीटर सर्व्हिस रोड गृहित धरला गेला होता. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने आता चौपदरीकरणाची रूंदी ६0 मीटर केली आहे. त्यामुळे दोन्हीकडे साडेसात मीटरची रूंदी वाढविली जाणार आहे. त्यानंतर महामार्गाला समांतर जाणारा शहरातील सर्व्हिस रोड १२ मीटरचा अतिरिक्त तयार करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व्हिस रोड शहरातून जात असताना एवढी जागा पुन्हा अधिग्रहित करणे कठीण होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होण्याची दाट शक्यता आहे. असे जर झाले तर सर्व्हिस रोडच्या मुख्य उद्देशालाच छेद जाईल. त्या भागातील वाहतूक आतल्या आत झाली पाहिजे आणि अपघाताच्या घटनांवर अंकुश बसावा, म्हणून शहरातील महामार्गावर सर्व्हिस रोड काढले जातात; मात्र पुरेशी जागा अधिग्रहित करता न येत असल्याने सर्व्हिस रोड महामार्गाच्या भागावर ओव्हरलॅप होणार आहे. आधीच्या ले-आऊटनुसार सर्व्हिसमध्ये विसंगती निर्माण होत आहे. १२ मीटरऐवजी सर्व्हिस रोड साडेचार मीटरचा करणे शक्य होईल. यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असा सूर आवळला जात आहे. अकोला शहरातील एमआयडीसी, मलकापूर, खडकी, पातूर येथून हा सर्व्हिस रोड जाणार आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची रूंदी कमी केल्यास तो कायम सारखा राहू शकतो.

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण शहरातून जात असताना अनेक ठिकाणी मुबलक  जागा मिळेलच असे नाही, त्यामुळे काही ठिकाणी तो ओव्हरलॅप होणार आहे. ६0 मीटर रूंदीनंतर १२ मीटर सर्व्हिस रोड शहरातून जावा, असा नियम आहे; मात्र काही ठिकाणी जागा नसेलच, त्या ठिकाणी तो कमी होऊ शकतो, अशा ठिकाणी सर्व्हिस रोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणावर ओव्हरलॅप होऊ शकतो.- विलास ब्राम्हणकर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण, अमरावती.