शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नाशिकच्या अपघातग्रस्त खेळाडूंनी मिळवले उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 9:04 PM

पराभूत होवूनही नासिक संघ ठरला बाजीगर; उपविजेतेपद

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: बोरगावमंजू जवळ बुधवारी अमरावतीला शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेकरिता जात असलेल्या नासिक विभागाचा १४ वर्षाखालील मुलांच्या संघाचा भिषण अपघात घडला. यामधून सावरलेले खेळाडू बुधवारी मध्यरात्री अमरावतीला पोहचले. गुरू वारच्या सकाळी स्पर्धेत दमदार प्रवेश करीत अमरावती व मुंबई विभागाच्या बलाढय संघांना पराभूत करू न नासिक विभाग अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. शुक्रवारी अंतिम सामन्यात लातूर विभागाला कडवी टक्क र देत नासिक विभागाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. नासिक विभागाला स्पर्धेत पराभवाचे जरी तोंड पाहावे लागले तरी त्यांच्या जिद्दीला सलाम करीत स्पर्धास्थळी नासिक विभागाचीच चर्चा होती. नासिक विभाग पराभूत होवूनही बाजीगर ठरला.नासिक जिल्हयातील सुरगणा तालुक्यातील अलंगुन येथील प्राथमिक आदिवासी आश्रमशाळेचा खो-खो संघ राज्य स्पर्धेसाठी अमरावतीकडे जात होता. अकोल्यापासून १२ किलो मीटर अंतरावर असताना बोरगाव मंजू नजीक बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान भीषण अपघात घडला. समोरू न येणाºया ट्रकने १३ खेळाडू घेवून जाणाºया गाडीला उडविले. अपघात ऐवढा भयानक होता की, गाडीची अवस्था पाहून पाहणाºयांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय राहत नव्हता. अपघातामध्ये दोन शिक्षक, गाडी चालक आणि तीन खेळाडू गंभीर जखमी झाले. गाडीतील सर्वांनी एका क्षणात समोर मरण बघितले. गाडीच्या धडकेच्या आवाजाबरोबर, किंकाळया आणि जखमांमधून भळभळ वाहणारे रक्त...सगळं अकल्पित. मरणाला चकवा देत सर्वजण परतले. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे चिमुकले खेळाडूंना मानसिक धक्का पोहचला. मात्र, अकोलेकर क्रीडाप्रेमी,क्रीडाशिक्षक, क्रीडा संघटना, क्रीडा पत्रकार यांनी खेळाडूंना सर्वोतोपरी मदत केली. मानसिक धक्क्यातून खेळाडूंना बाहेर काढले. आणि स्पर्धा खेळण्यास प्रवृत्त करू न स्पर्धास्थळी सुखरू प पोहचविले. तर गंभीर जखमींचा रू ग्णालयात उपचार सुरू होता. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.कठीण प्रसंगात यशाचा मार्ग अवघड दिसत असूनही चिमुकले खेळण्यास सज्ज झाले. जिंकण्याची जिद्द आणि कु ठल्याही परिस्थितीत पराभूत व्हायचे नाही, हा मंत्र क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांकडून प्रत्येक खेळाडूंना मिळत असते. हाच मंत्र जपत अलंगुणच्या खेळाडूंनी नासिक विभागाचे प्रतिनिधीत्व करीत बलाढ्य लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणाºया उस्मानाबाद संघाला बरोबरीची टक्कर दि
टॅग्स :AkolaअकोलाNashikनाशिकAmravatiअमरावती