शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:13 IST

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनद्वारा सन २0१७-१८ मध्ये उत्पादित तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देतूर पिकासाठी आधारभूत दर : प्रति क्विंटल  ५,२५0 रुपये अधिक २00 रुपये बोनस जाहीरतूर विक्रीसाठी शेतकर्‍यांना नाफेडच्या ई-पोर्टलवर नाव नोंदणी करावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनद्वारा सन २0१७-१८ मध्ये उत्पादित तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.सदर खरेदी केंद्रावर खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष अ.सु. तिडके यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती सु.भ.तिडके, संचालक ठाकरे, खरेदी-विक्री संस्थेचे उपाध्यक्ष अ.प्र.लोडम, बा.पु.महल्ले, तसेच व्ही.सी.एम.एफ.चे जिल्हा विपणन व्यवस्थापक वाघ, संजय भुईभार, अशोक भुईभार, बाजार समितीचे सचिव रितेश मडगे, खरेदी-विक्री व्यवस्थापक धि.ना. मुले व सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी तूर पिकासाठी आधारभूत दर प्रति क्विंटल  ५,२५0 रुपये अधिक २00 रुपये बोनस याप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या तूर विक्रीसाठी नाफेडच्या ई-पोर्टलवर नाव नोंदणी करावी, एका शेतकर्‍याकडून एका दिवशी फक्त २५ क्विंटल (५0 किलोच्या ५0 बॅग ) याप्रमाणे खरेदी करण्यात येईल. शासनाने ठरवून दिलेल्या एकरी ३.५0 क्विंटल या एकरी उत्पादकतेच्या निकषानुसार तूर खरेदी करण्यात येईल. शेतकर्‍यांकडून फक्त एफ.ए.क्यू. दर्जाची तूरच खरेदी करण्यात येईल, तसेच आर्दतेचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असू नये, आपला माल वाळवून, सुकवून व चाळणी करून खरेदी केंद्रावर आणावा, खरेदी केंद्रावर तूर आणताना सोबत सात-बाराचा मूळ उतारा आणणे आवश्यक आहे, असे जिल्हा विपणन व्यवस्थापक व्ही.बी.वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरMarket Yardमार्केट यार्ड