शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर एसडीपीओ, ठाणेदार हाजीर हो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:39 IST

अकोला - मुंबई, पुण्यातील क्लबला लाजविणारा मोठा जुगार क्लब मूर्तिजापूर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमूर्तिजापूर एमआयडीसीत सुरूअसलेल्या हायफाय क्लबच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पर्दाफाश केला होता. आरोपींना तातडीने जामीन दिल्याने मूर्तिजापूर पोलिसांचा हा प्रताप पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांच्या रडारवर आला.उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे व गुन्हे शोध पथकाची चांगलीच कानउघाडणी करून त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

- सचिन राऊत

अकोला - मुंबई, पुण्यातील क्लबला लाजविणारा मोठा जुगार क्लब मूर्तिजापूर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर प्रचंड संतापले असून, त्यांनी मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे व गुन्हे शोध पथकाला पेशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.मूर्तिजापूर एमआयडीसीत सुरूअसलेल्या हायफाय क्लबच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर या ठिकाणावरून बँक मॅनेजर, नगरसेवक, नगरसेवक पुत्र, उद्योजक, व्यावसायिक यांना अटक करण्यात आली होती. या बड्या आरोपींना न्यायालयात हजर करण्याऐवजी मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना टेबलवर जामीन देऊन संशयास्पद भूमिका उघड केली. मोठ्या क्लबकडे ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक व आरोपींना तातडीने जामीन दिल्याने मूर्तिजापूर पोलिसांचा हा प्रताप पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांच्या रडारवर आला. त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध धंद्यांमुळे पोलीस अधीक्षक प्रचंड संतापले. त्यानंतर मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे व गुन्हे शोध पथकाची चांगलीच कानउघाडणी करून त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन अधिकाºयांसह गुन्हे शोध पथकाला सोमवारीच हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र पोलीस बंदोबस्त व जननीसारख्या कार्यक्रमामुळे त्यांना येत्या दोन ते तीन दिवसात पोलीस अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे सांगण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मूर्तिजापूर शहरात गुटख्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरु असून, मोठे क्लब व अवैध धंद्यासह दारुचा महापूर आला आहे. याकडे मूर्तिजापूर पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी त्यांना तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत ७० च्या जवळपास अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर विशेष पथकात १० कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांची संख्या असताना मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, पातूर, हिवरखेड, तेल्हारा, बोरगाव मंजु, बार्शीटाकळी यांसारख्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर विशेष पथकाकडूनच कारवाई करण्यात येत आहे. त्या तुलनेत ६० पेक्षा अधिक संख्या असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मात्र या ठिकाणावर बोटावर मोजण्याइतक्याही कारवाया नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘अवचार’ प्रचंड अवतार दाखवीत असून, बार्शीटाकळीसह तालुक्याच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात ‘माया’ गोळा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरPoliceपोलिस