शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर : दोन लाचखोर ‘पीएसआय’सह पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:57 IST

अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी लाच मागणार्‍या दोन पीएसआयसह एका पोलीस कर्मचार्‍यास शनिवारी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या तीन जणांच्या निलंबनाचा आदेश दिला.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश, ‘एसीबी’च्या अहवालावरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी लाच मागणार्‍या दोन पीएसआयसह एका पोलीस कर्मचार्‍यास शनिवारी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या तीन जणांच्या निलंबनाचा आदेश दिला. यामध्ये पीएसआय अश्‍विनी गायकवाड, पीएसआय गणेश कोथळकर, पोलीस कर्मचारी दीपक तायडे या तिघांचा समावेश आहे. एसीबीच्या अहवालानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मूर्तिजापूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शिक्षण संस्थाचालकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. यावरून मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पीएसआय अश्‍विनी गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. आरोपीला तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच आरोपीला लाभ मिळेल, या दिशेने दस्तावेज तयार करण्यासाठी अँड. सचिन वानखडे याच्या माध्यमातून तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागण्यात आली; मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी मूर्तिजापूर गाठून आरोपी अश्‍विनी गायकवाड, गणेश कोथळकर व अँड. सचिन वानखडे या तिघांना ताब्यात घेतले; मात्र तीनही आरोपींना समजपत्र देऊन सोडले. यावरून अकोला एसीबीची कारवाई प्रचंड संशयाच्या घेर्‍यात सापडली. त्यानंतर एसीबीच्या अहवालावरूनच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पीएसआय अश्‍विनी गायकवाड, पीएसआय गणेश कोथळकर, पोलीस कर्मचारी दीपक तायडे या तीन जणांना निलंबित केले; मात्र आता एसीबीच्या अधिकार्‍यांची मोठी गोची झाल्याचे दिसून येत आहे. कारण समजपत्र देऊन सोडलेला एकही आरोपी अद्याप अटक करण्यात आला नसल्याने एसीबीकडे बोट दाखविण्यात येत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरPoliceपोलिस