शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूरची पाणीटंचाई; ७.४८ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:03 IST

मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याकरिता ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी योजनेचा प्रस्ताव पाठविला विभागीय आयुक्तांकडेमहानपासून उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याकरिता ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने, अकोला शहर आणि मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असल्याने, मूर्तिजापूर शहराला काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यानुषंगाने सद्यस्थितीत मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घुंगशी बॅरेज हाच एकमेव स्रोत असल्याच्या पृष्ठभूमीवर मूर्तिजापूर शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे. घुंगशी बॅरेज प्रकल्पाची साठवण क्षमता १७.४४४ दशलक्ष घनमीटर असून, पिण्याच्या पाण्यासाठी २.६२ दशलक्ष घनमीटर साठा आरक्षित आहे. मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १.५0 दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी आहे. त्यानुषंगाने मूर्तिजापूर शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्यासाठी ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या आकस्मिक पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १0 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. अंदाजपत्रकासह पाठविलेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून मान्यता प्राप्त झाली आहे.

महानपासून उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण!जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून  खांबोरा जवळील उन्नई बंधार्‍यापर्यंंत जलवाहिनी टाकण्याकरिता १९ कोटी ९१ लाख ६५ हजार रुपयांच्या योजनेला शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जलवाहिनी टाकण्याच्या योजनेंतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दर मंजुरीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत सदस्य-सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.