शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर आगार कारंजात स्थानांतरित होणार; वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:25 IST

मूर्तिजापूर : गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले, मान्यता नसलेले आगार आता बंद  होणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्राने दिली.

ठळक मुद्दे१४ वर्षांपासून सुरू असलेले मुर्तिजापूर आगार मान्यतेविना!सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाच्या नावाखाली कारंजा येथे स्थानांतरित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर (अकोला): गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले, मान्यता नसलेले आगार आता बंद  होणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्याची  माहिती परिवहन मंडळाच्या सूत्राने दिली, तसेच मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून ७  जून २0१७ याविषयी पत्र निघाले होते. या पत्रानुसार १ जुलै २0१७ पासून आगार  बंदसुद्धा होणार होते; परंतु राजकीय दबावामुळे प्रकरण थंड बस्त्यात ठेवल्या गेले  होते. आता पुन्हा हे आगार बंद सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाच्या नावाखाली बंद  करून कारंजा येथे स्थानांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये  सुरू आहे. या आगाराचे भूमिपूजन ३१ नोव्हेंबर १९९७ ला तत्कालीन परिवहन मंत्री चंद्रकांत  खैरे यांच्या हस्ते महामंडळाचे त्यावेळीचे अध्यक्ष शिवाजीराव गोताड यांच्या हस्ते  झाले. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर अर्थात ९ मे २00३ रोजी उद्घाटन झाले. १४  वर्षांनंतरसुद्धा मूर्तिजापूर आगार सुविधांबाबत दुर्लक्षितच राहिले आहे. एवढेच नव्हे,  तर आगाराला मान्यतासुद्धा मिळाली नव्हती. हाच राज्य परिवहन मंडळाचा  रचलेला घाट होता की काय, असा प्रश्न आज निर्माण होत आहे.आगाराचे सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाच्या गोंडस नावाखाली महामंडळाची बैठक  पूर्वीच २ जून २0१७ रोजी झालेली आहे. या बैठकीत मूर्तिजापूर आगार कारंजा  आगाराला जोडण्याचा निर्णय झाला आहे. वास्तविक पाहता स्पर्धेच्या युगात आगार  वाढविणे अपेक्षित आहे; मात्र एसटी मागे मागे जात आहे, असे महामंडळाच्या  निर्णयावरून दिसून येते. याविषयी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याशी संपर्क  करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मूर्तिजापुरातील आगर  हलवल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे यांनी दिला आहे. 

मूर्तिजापूर आगार बंद किंवा स्थानांतरित करण्याविषयी वरिष्ठांकडून कुठलेच पत्र  मिळालेले नाही. सध्या तरी असा कोणताही प्रयत्न सुरू नाही. कार्यालयीन पत्र  मिळाल्याशिवाय काहीही बोलणे योग्य नाही. - योगेश ठाकरे, प्रभारी, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरstate transportराज्य परीवहन महामंडळ