शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर शहरात भामट्याने घातला व्यापार्‍यांना गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:21 IST

भामट्याने व्यापारी आणि लहान विक्रेत्यांना विश्‍वासात घेऊन त्यांचेकडून किराणा माल व नगदी रुपये घेतले. काही वेळाने माझा माणूस बँकेतून रोकड घेऊन येत आहे, अशी बतावणी करून नगदी घेतलेले १0 ते १५ हजार रुपये घेऊन पसार झाला आणि गाडी व माल तेथेच सोडून दिला. 

ठळक मुद्दे१५ हजार रुपये घेऊन केला पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर :  शहरातील मंगळवार बाजार परिसरात एका अज्ञात भामट्याने व्यापार्‍यांना १५ हजार रुपयांनी गंडा घातल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली.  

भामट्याने व्यापारी आणि लहान विक्रेत्यांना विश्‍वासात घेऊन त्यांचेकडून किराणा माल व नगदी रुपये घेतले. काही वेळाने माझा माणूस बँकेतून रोकड घेऊन येत आहे, अशी बतावणी करून नगदी घेतलेले १0 ते १५ हजार रुपये घेऊन पसार झाला आणि गाडी व माल तेथेच सोडून दिला.  एका अज्ञात व्यक्तीने अकोला शहरातून २७00 रुपये भाड्याने मालवाहू वाहन घेऊन मंगळवार बाजार स्टेशन विभाग मूर्तिजापूर गाठले. तेथे आल्यावर परिसरात असलेल्या किराणा व्यापारी, भाजी व फळ विक्रेता यांना विश्‍वासात घेऊन जवळच रेल्वेचे भले मोठे काम सुरू आहे. तेथील मजुरांकरिता किराणा पाहिजे असल्याची बतावणी केली. तसेच दोन तीन किरणा दुकानातून त्याने ६0 ते ७0 हजार रुपयांचा किराणा माल घेऊन भाड्याने आणलेल्या वाकोडे नामक व्यक्तीच्या गाडीत भरला.त्यानंतर त्याने आपला मोर्चा इतर लहान सहान भाजी व फळ विक्रेते यांचेकडे वळवून अनेकांजवळून हजार, दोन हजार, पाचशे असे उसने स्वरुपात गोळा केले. माझा माणूस बँकेत गेला आहे आणि रोकड घेऊन आल्यावर सर्वांचे पैसे परत देतो. माझी गाडी मालाने उभी आहे असे म्हणून दहा ते १५ हजार रुपये गोळा करून सदर अज्ञात व्यक्ती येतो म्हणून गेला तो परत न आलाच नाही. ज्यांच्याकडून त्याने किराणा माल घेतला त्या व्यापार्‍यांनी आपला माल गाडीतून परत उतरून घेतला. मात्र ज्यांच्याकडून त्या अज्ञात भामट्याने नगदी रुपये घेतले त्यांना जबर फटका बसला आहे. विशेष म्हणजे जे गाडी त्याने अकोला येथून भाड्याने आणली होती त्या गाडीच्या चालकाजवळूनही त्याने २५00 रुपये उसने घेतल्याची माहिती चालकाने दिली आहे.या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर व्यापार्‍यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती.  

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrimeगुन्हा