शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या; आरोपीस खामगाव तालुक्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 19:05 IST

Akola Crime News आरोपी राहुल मोहन गवारगुरू यास संभापूर, ता. खामगाव येथून अटक केली.

बाळापूर : तालुक्यातील कोळासा येथे एकाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. बाळापूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित मंगळ‌वार, १० नोव्हेंबर रोजी फरार असलेल्या आरोपी राहुल मोहन गवारगुरू यास संभापूर, ता. खामगाव येथून अटक केली. तालुक्यातील ग्राम कोळासा गावात वरली, मटका, गावठी दारुची अवैध विक्री जोरात सुरू आहे. आरोपी राहुल मोहन गवारगुरु व मृत रामकिसन राजपूत बिहारी हे दोघे चोरी करून आणलेले साहित्य विक्री करीत होते. विक्रीच्या हिस्सेवाटणीवरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने ग्रामस्थांचे दुर्लक्ष होत असे. दोघांवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सोमवारी आरोपी राहुल व मृत रामकिसन बिहारी दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी होऊन राहुल याने रामकिसन बिहारी यांच्यावर कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली. घटनेनंतर आरोपी राहुल मोहन गवारगुरु हा फरार झाला होता. आरोपी हा संभापूर, ता. खामगाव येथे त्याच्या काकाकडे लपून असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी त्याला सकाळी ९ वाजता अटक केली. पोलीस कर्मचारी अनंत सुरवाडे, राजू नागरे, गणेश जंजाळ यांनी मोठ्या शिताफीने आरोपिस ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध बाळापूर पोलिसांनी भादंविच्या ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप -निरीक्षक मनोज वासाडे करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी