शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुकीम अहमद हत्याकांड;  नववा आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:28 IST

अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील नवव्या आरोपीस अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी सै. महेफुज सै.मेहबुब असे या आरोपीचे नाव असून, त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.या प्रकरणातील आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या पथकाने या आरोपीस अटक केली आहे.

अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील नवव्या आरोपीस अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी सै. महेफुज सै.मेहबुब असे या आरोपीचे नाव असून, त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.दामले चौकातील केदार मंदार अपार्टमेंटमधील रहिवासी मुकीम अहमद अब्दुल बशीर व बुलडाण्याच्या साखरखेर्डा या गावातील त्यांचा सहकारी शेख शफी शेख कादरी या दोघांची खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आझाद कॉलनी येथील रहिवासी मौलवी तब्बसूर कादरी याच्या निवासस्थानी गळा आवळून हत्या करण्यात आली होती. दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून कारने बुलडाणा जिल्ह्यातील साकर्शा जंगलात फेकण्यात आले होते. या हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार शेख चांद व शेख कौसर शेख अफसर हे दोघे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, ते दोघेही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकरणातील आठ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून, नवव्या आरोपीस यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी सै. महेफुज सै. मेहबूब यास अटक करण्यात आली आहे. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या पथकाने या आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष महल्ले करीत आहेत.अटकेतील आरोपीमौलवी तसब्बूर कादरी रा. अकोला, जब्बार खा सत्तार खा, सै. अस्लम सै. हुसेन दोघेही रा. वाकद वाशिम, शेख इम्रान शेख कदीर व शेख मुक्तार शेख नूर रा. मेहकर, शब्बीरशहा अन्वरशहा रा. खाकडी बुलडाणा, कारचालक संदीप आत्माराम दातार, सै. महेफुज सै.मेहबूब यांचा अटकेतील आरोपींमध्ये समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशन