शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आयुक्त पाहणार अहवाल; कार्यकारी अभियंता करणार अभ्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:02 IST

महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तर आॅडिटचा अभ्यास करून कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

अकोला: शहरातील सिमेंट रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणाचा (सोशल आॅडिट) अहवाल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केल्यानंतर तीन दिवसांचा कालावधी उलटला; मात्र अहवालानुसार संबंधित यंत्रणांकडून कारवाईच्या कोणत्याही हालचाली अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. सोशल आॅडिटचा अहवाल बघितल्यानंतर कारवाई करणार असल्याचे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तर आॅडिटचा अभ्यास करून कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाने २०१२ मध्ये १५ कोटींचा निधी दिला होता. प्राप्त निधीतून मनपा प्रशासनाने सहा सिमेंटच्या, तर बारा डांबरी रस्त्यांची निविदा प्रकाशित केली होती. स्थानिक ‘आरआरसी’ कंपनीने १२ टक्के जादा दराने सादर केलेली सिमेंट रस्त्यांची निविदा प्रशासनाने मंजूर केली. यामध्ये मुख्य पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, माळीपुरा ते मोहता मिल, अशोक वाटिका ते सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत आदी रस्त्यांचा समावेश होता. सदर रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिगळ लावण्याची वेळ कंत्राटदारावर आली होती. यासोबतच नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालय तसेच सरकारी बगिचा ते सार्वजनिक बांधकाम विभागपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट रस्त्यांचे निर्माण केले. शहरात तयार करण्यात आलेले सिमेंट रस्ते अतिशय दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सहा रस्ते कामांचे सोशल आॅडिट करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै रोजी दिला. त्यानुसार अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे २२ ते २७ जुलै दरम्यान सोशल आॅडिट करण्यात आले. या आॅडिटमध्ये घेण्यात आलेल्या रस्ते कामांच्या नमुन्यांचा अहवाल २४ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक केला. त्यानुसार शहरातील सहाही सिमेंट रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आढळून आला. यासंदर्भात कारवाई करण्याची पुढील जबाबदारी महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग