शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘पीए’ ने स्वीकारली लाच; अकोला मनपा उपायुक्त सोळंकेना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:00 IST

बिअर शॉपी सुरू करण्यासाठी मनपाच्या शॉप अँक्टचा परवाना घेणे  बंधनकारक आहे. हा परवाना देण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त समाधान चांगो  सोळंके यांनी त्यांच्या स्वीय सहायकामार्फत बुधवारी रात्री ८.३0 एका हॉटेलवर २0  हजार रुपयांची लाच स्वीकारली.

ठळक मुद्देबिअर शॉपी सुरू करण्यासाठी मनपाच्या शॉप अँक्ट परवाना प्रकरण सोळंके यांच्या स्वीय सहायकाने स्वीकारली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बिअर शॉपी सुरू करण्यासाठी मनपाच्या शॉप अँक्टचा परवाना घेणे  बंधनकारक आहे. हा परवाना देण्यासाठी अकोला महापालिकेचे उपायुक्त समाधान चांगो  सोळंके यांनी त्यांच्या स्वीय सहायकामार्फत बुधवारी रात्री ८.३0 एका हॉटेलवर २0  हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वीय सहायक  राजेश रामदास जाधव याला अटक केल्यानंतर उपायुक्त समाधान सोळंके यांना  त्यांच्या घरातून अटक केली. मनपाचे आयुक्त अजय लहाने यांची बदली होताच,  मनपा प्रशासनावर बालंट आले, हे विशेष. शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाने बिअर शॉपी सुरू करण्यासाठी मनपाकडे  शॉप अँक्ट परवाना मिळावा, यासाठी अर्ज केला होता. या हॉटेल व्यावसायिकाला  शॉप अँक्ट परवाना देण्यासाठी मनपाचे उपायुक्त समाधान सोळंके यांनी  त्याच्याकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; परंतु २५ हजार रु पयांऐवजी २0 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. दोघांमध्ये २0 हजार रु पयांमध्ये तडजोड झाली. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाकडे तक्रार केली. बुधवारी २0 हजार रुपये हॉटेलवरून घेऊन जाण्यास  व्यावसायिकाने उपायुक्त सोळंके यांना सांगितले. त्यामुळे सोळंके यांनी त्यांचा स्वीय  सहायक राजेश जाधव याला हॉटेलवर पैसे घेण्यास पाठविले. जाधव हा पैसे  घेण्यास गेला आणि त्याने हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाकडून २0 हजार रुपयांची  रक्कम स्वीकारताच हॉटेलजवळच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या अधिकार्‍यांनी जाधव याला रंगेहात पकडले आणि त्याला अटक केली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी उपायुक्त सोळंके यांच्या राम  नगर म्हाडा कॉलनीतील घरी जाऊन त्यांना अटक केली. सोळंके यांच्या घरातून  हॉटेल व्यावसायिकाचे कागदपत्रेसुद्धा एसीबीच्या अधिकार्‍यांनी जप्त केल्याची  माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले. 

जाधव ने जेवण केल्यानंतर आणखी केली दोन हजारांची मागणीउपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून त्यांचा स्वीय सहायक राजेश  जाधव हा हॉटेलवर गेला. त्याने प्रारंभी तेथे यथेच्छ भोजन केले. त्यानंतर जाधवने  २0 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली आणि वरून हॉटेल व्यावसायिकाकडे स्व त:च्या खर्चपाण्यासाठी दोन हजार रुपयेसुद्धा मागितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाAkola cityअकोला शहरMuncipal Corporationनगर पालिका