शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

महापालिकेचे मार्केटला ‘फटाके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:09 IST

अकोला : ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ‘एसीसी’ मैदानावरील फटाका मार्केटला परवानगी नाकारली. अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याच्या सबबीखाली वीज पुरवठाही खंडित केला.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींनी घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ‘एसीसी’ मैदानावरील फटाका मार्केटला परवानगी नाकारली. अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याच्या सबबीखाली वीज पुरवठाही खंडित केला. या प्रकाराची माहिती मिळताच आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर तसेच मनपा पदाधिकार्‍यांनी फटाका मार्केटमध्ये धाव घेऊन तोडगा काढला. दिवाळी दोन दिवसांवर असताना मनपाच्या आततायी कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये रोष पसरला आहे. अकोला क्रिकेट क्लब (एसीसी) मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाके विक्रीचा बाजार सजला. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून संबंधित व्यावसायिकांकडून रीतसर परवानगी घेतली जाते. मैदानावर उभारल्या जाणार्‍या दुकानांमध्ये ठरावीक अंतर असावे, प्रत्येक दुकानात अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता करावी, रेतीने भरलेल्या बादल्या असाव्यात, यांसह विविध नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. अर्थात, या सर्व निकषांचे पालन केल्यानंतरच महावितरण कंपनीकडून विद्युत मीटरची परवानगी दिली जाते. फटाका विक्रेत्यांनी दोन दुकानांमध्ये अंतर न सोडताच, शिवाय अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याच्या सबबीखाली मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांनी ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी फटाके विक्रेत्यांना फटाके लावले. दुकानांना दिलेली परवानगी रद्द करीत वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला दिले. मनपाच्या निर्देशानुसार वीज कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करताच फटाका असोसिएशन आणि ग्राहकांची धावपळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, गटनेता राहुल देशमुख यांनी मैदानावर धाव घेऊन व्यावसायिकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे, विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते. 

अखेर तोडगा काढला!मनपाच्या निकषांची पूर्तता करणे फटाका व्यावसायिकांनी अपेक्षित आहे; परंतु मनपानेसुद्धा ऐन दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी कारवाईचा बडगा उगारणे कितपत योग्य, असा सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. मैदानावरील ५४ दुकानदारांनी अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता करावी आणि प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी, या मुद्यावर लोकप्रतिनिधींनी यशस्वी शिष्टाई करीत तोडगा काढला.

टॅग्स :diwaliदिवाळी