शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा फुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:20 IST

अकोला: महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांवरील शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत.

अकोला: महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांवरील शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. या दोन्ही माध्यमातील १९ शिक्षकांच्या बदल्यांना मनपा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. संबंधित शाळेवरील यंत्रणा सुरळीत चालावी, यानुषंगाने पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.महापालिकेच्या एकाच शाळेत चक्क वीस ते बावीस वर्षे ठाण मांडून बसणाऱ्या शिक्षकांच्या हेकेखोर व मनमानी कारभारामुळे शिक्षणप्रणालीचा बोजवारा उडाल्याचे चित्र होते. मनपातील पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आणि शिक्षक संघटनेतील काही दलालांना हाताशी धरून शिक्षकांकडून बदल्यांचा खेळ सुरू होता. या प्रकाराला मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी चाप लावत एकाच शाळेवर ठिय्या दिलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या. पहिल्या टप्प्यात १२ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ एकाच शाळेवर व्यतित करणाºया शिक्षकांचा समावेश होता. दुसºया टप्प्यातील बदली प्रक्रियेत पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ घालविणाºया शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी हीच पद्धत कायम ठेवत संबंधित शाळेवर तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाला असेल आणि प्रशासनाला त्या-त्या शिक्षकांच्या बदलीची गरज भासल्यास बदली करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान,बहुतांश शिक्षकांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ होत नसल्याने जितेंद्र वाघ यांनी काही शिक्षकांच्या बदलीचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. यंदा मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षण विभागाकडे मनपा पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिफारशींचा अक्षरश: पाऊस पडला होता. तसेच चालू शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदलीसाठी दबावतंत्राचा वापर सुुरू केला होता. त्यामुळे ज्या शिक्षकांच्या नियुक्तीला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्यांची प्रशासन व शिक्षण विभागाने बदली केल्याची माहिती आहे.बदलीसाठी आग्रही; सुधारणा नाही!सोयीच्या शाळेवर बदली व्हावी, याकरिता अनेक शिक्षक सतत धडपडत असतात. गोरगरीब विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया शिक्षणात सुधारणा व्हावी, त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी कोणतेही शिक्षक किंवा त्यांच्या दुकानदार संघटनांनी जाहिररीत्या प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. मनपा मराठी मुलांची शाळा क्र. २६, मराठी मुलांची शाळा क्र. ७ यासह काही बोटांवर मोजता येणाºया उर्दू शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्नरत असल्याचे दिसून येते.

दोन वर्षांचा कार्यकाळ; तरीही बदलीशिक्षण विभागाने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ आणि उपायुक्त प्रमोद कापडे यांच्यामार्फत बदली प्रक्रियेला मंजुरी मिळविली. दोन्ही उपायुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात जेमतेम दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या शिक्षकांचाही समावेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पदाधिकारी, नगरसेवकांच्या शिफारशींना झुकते मापमर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे २८ पेक्षा जास्त नगरसेवक ांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. यातील काही पदाधिकारी व प्रभावी नगरसेवकांच्या शिफारशींना झुकते माप देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTeacherशिक्षक