शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाली आहे - राजेश मिश्रा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 1:30 PM

अकोला: सत्ताधारी भाजपच्या कालावधीत विविध घोळ समोर येत आहेत. त्यावर अंकुश लावण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरला असून, महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभागृहात केला.

अकोला: सत्ताधारी भाजपच्या कालावधीत विविध घोळ समोर येत आहेत. त्यावर अंकुश लावण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरला असून, महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभागृहात केला. सिमेंट रस्ते प्रकरणात कंत्राटदारावर काय कारवाई केली पाहिजे, यावर चर्चा न करता ती भरकटल्याचे सांगत काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी ‘जाना था जापान पहुँच गये चीन’, अशी मार्मिक टिप्पणी केली. त्यावेळी राजेश मिश्रा यांनी तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्यामुळेच शहरातील अरुंद रस्ते प्रशस्त झाल्याचे सांगत लहाने हे तांत्रिक अधिकारी नसल्याचे आवर्जून सांगितले.सिमेंट रस्त्यांचा मुद्दा उपस्थित होताच भाजपचे गटनेता राहुल देशमुख, गिरीश गोखले यांनी निविदेचे दर, रस्ते देखभाल दुरुस्तीचा कालावधी आदी मुद्यांवर प्रशासनाने प्रकाशझोत टाकण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार कंत्राटदावर ३० दिवसांच्या आत कारवाई करण्याचे नमूद केल्यानंतरही कारवाईला विलंब होत असल्याबद्दल शंका उपस्थित केली. जिल्हाधिकाºयांकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार असताना त्यांनी याप्रकरणी कारवाई का केली नाही, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, असा प्रश्न साजीद खान यांनी उपस्थित केला. यावर भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर रस्त्यांची तपासणी केली असून, कोणाचीही पाठराखण केली जात नसल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले.कॅनॉलच्या मुद्यावर घसे कोरडे!मागील वर्षभरापासून डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंतच्या कॅनॉलची मोजणी केली जात आहे. भाजपने जाणीवपूर्वक या रस्त्याचे काम थंड बस्त्यात टाकल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केला. मोजणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या रस्त्याचे तातडीने निर्माण करण्याची मागणी भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर, सेनेच्या मंजूषा शेळके यांनी केली. या मुद्यावर नगरसेवक घसे कोरडे करीत असले तरी महापौर विजय अग्रवाल यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. आश्रय नगरमधील जलकुंभाची सुरक्षा ‘राम भरोसे’ असून, त्या ठिकाणी आवारभिंत, पथदिवे व सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी सूचना सुनील क्षीरसागर यांनी केली.नगरसेवक उवाच्...जिल्हाधिकाºयांच्या अहवालात कंत्राटदारावर चार प्रकारची कारवाई निश्चित केली आहे. त्यापैकी क्रमांक दोननुसार कंत्राटदाराकडून रस्त्यांची पूर्ण दुरुस्ती करण्यासह त्यांच्यावर दहा वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.

-  हरीश आलिमचंदानी

 रस्ते दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात यावी. - साजीद खान पठाण

जिल्हाधिकाºयांच्या अहवालानुसार कंत्राटदारावर कारवाई करा, नुकसान भरपाई घेऊन रस्ते दुरुस्तीचा कालावधी निश्चित करा, या प्रकरणामुळे ८० नगरसेवकांवर मलिदा लाटल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने निष्पक्ष कारवाई करावी.

- डॉ. जिशान हुसेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’ या नाºयाची पोलखोल झाली. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यावर आठ महिन्यांनी कारवाईचा मुहूर्त. एकूणच चित्र पाहता संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचे दिसते.

- मोहम्मद मुस्तफा

रस्ते प्रकरणी भाजपासह प्रशासनावर वेळकाढूपणाचे आरोप होत आहेत. प्रशासनाने ‘व्हीएनआयटी’मार्फत चौकशीचा कालावधी स्पष्ट करावा.

-  गिरीश गोखले

रस्ते प्रकरणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे. भाजपने वेळकाढूपणा न करता कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.

-  अ‍ॅड. धनश्री देवभाजप नगरसेवकाचा सभागृहात शिमगासिमेंट रस्त्यांचा मुद्दा पटलावर असतानाच भाजप नगरसेवक सुभाष खंडारे यांनी निकृष्ट नालीचे बांधकाम करणाºया कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी लावून धरीत सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. गिरीश गोखले यांनीसुद्धा महापौरांनी कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या मुद्यावरून महापौर व गिरीश गोखले यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचे दिसून आले. महापौर अग्रवाल कारवाई करीत नसल्याचे पाहून नगरसेवक सुभाष खंडारे यांनी महापौरांच्या समोर जमिनीवर झोपून निषेध केला. त्यांना गटनेता राहुल देशमुख, गिरीश गोखले यांनी उचलून खुर्चीवर बसविले.पत्रकारांचा अपमान; ठराव पारित करा!जिल्हाधिकाºयांनी पत्रकारांचा अपमान केल्याचा निंदनीय प्रकार उजेडात आला आहे. निष्पक्ष लिखाण करणाºया पत्रकारांचा अधिकारी अपमान क रीत असतील तर त्यांच्याविरोधात कारवाईचा ठराव शासनाकडे पाठविण्याची मागणी भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी सभागृहात केली. त्यावर आजच्या सभेत हा विषय नसल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. वेळेवरच्या विषयांतही सत्ताधारी या मुद्यावर निर्णय घेऊ शकले असते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका