मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:27 PM2019-09-18T12:27:38+5:302019-09-18T12:30:20+5:30

महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेऊन आयुक्तांनी कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.

  Municipal Commissioners take class of Health Department officials | मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस'

मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस'

Next


अकोला : प्लास्टिक आणि कचरामुक्त शहराच्या अंमलबजावणीसाठी अकोला महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना मंगळवारी डोस दिला. १७ सप्टेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेऊन आयुक्तांनी कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.
स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त कापडणीस यांनी ही बैठक घेतली. शहर प्लास्टिकमुक्त करणे, कचरा घंटागाडीद्वारे शहरातील शंभर टक्के कचरा उचलणे, कचरा घंटा गाडी व्यतिरिक्त इतरत्र कचरा टाकणाºयांवर तसेच शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक विक्री व वापर करणाºयांवर दंडात्मक कार्यवाही करणे, ट्रॅक्टरद्वारे शहरातील संपूर्ण कचरा उचलणे, कचरा विलगीकरण करून गोळा करणे, कचरा घंटागाडीमध्ये आवश्यकतेनुसार डीझल देणे, पडीत कंत्राटदाराने काम न केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करणे आदींबाबत सूचना दिल्या. सोबतच स्वच्छतेच्या कामामध्ये दिरंगाई किंवा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, तसेच सर्व अधिकारी-कर्मचाºयांनी आपली कर्तव्ये नीट पार पाडावी, आदींबाबत सूचना दिल्या, तसेच बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी स्वच्छता राखण्याची सामूहिक शपथ घेतली. या सभेमध्ये मनपा उपायुक्त रंजना गगे, क्षेत्रीय अधिकारी प्रशांत राजुरकर, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, श्याम बगेरे, शहर समन्वयक दीपा गणोरकर, प्र.मुख्य आरोग्य निरीक्षक संजय खोशे, सर्व आरोग्य निरीक्षक तसेच ट्रॅक्टर कंत्राटदार आदींची उपस्थिती होती.
 

आरोग्य निरीक्षकास केले बडतर्फ
अकोला महापालिकेतील आउट सोर्सिंगमधील आरोग्य निरीक्षक शुभम पुंड यांची सेवा मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तडकाफडकी  कामावरून कमी केली. मनपा आयुक्तांना पुंड निरीक्षक असलेल्या अनेक भागात कचरा दृष्टीस पडल्याने आणि स्वच्छता होत नसल्याने त्यांनी ही कारवाई केली. महापालिकेच्या ८० प्रभागांतील २९ विभागांत महापालिकेची यंत्रणा आणि इतर प्रभागात ठेके पद्धतीने कामकाज होत आहे. प्रतिविभागात १२ मजूर कार्यरत असताना आणि त्यांच्यावर लक्षावधीचा खर्च होत असतानादेखील सफाई का नाही, असा प्रश्न मनपा आयुक्तांनी उपस्थित करून पुंड यांच्यावर मंगळवारी ही बडतर्फीची कारवाई केली.

Web Title:   Municipal Commissioners take class of Health Department officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.