शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मनपा आयुक्त रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 16:52 IST

मनोबल उंचावण्यासाठी खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.

अकोला: महापालिकेच्या उत्तर झोनमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहून या भागामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करणाºया मनपा कर्मचाऱ्यांचे व आशा वर्कर यांचे मनोबल उंचावण्यासाठी खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या भागांमध्ये आयुक्त कापडणीस परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जात असल्याने मनपा कर्मचाºयांना बळ मिळत असल्याची चर्चा आहे.जीवघेण्या कोरोना व्हायरसचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण ७ एप्रिल रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये बैदपुरा भागात आढळून आला. त्यानंतर ८ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण प्रभाग क्रमांक १२ मध्ये अकोट फैल परिसरात आढळून आला होता. यादरम्यान प्रभाग क्रमांक ११ मधील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यात भरीस भर प्रभाग क्रमांक ११ मधीलच ताजनापेठ परिसरातील एका ४५ वर्षांच्या इसमाला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याच मृतकाच्या कुटुंबातील आणखी दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अर्थात, आज रोजी प्रभाग क्रमांक ११ मध्ये एकूण सात लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. या भागातील संपूर्ण नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे. ८ एप्रिल रोजी बैदपुरा परिसरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या मनपाच्या पथकांना स्थानिक रहिवाशांनी घेराव घालून त्यांच्याकडील कागदपत्रे हिसकावून घेतल्याची घटना घडली होती. असाच प्रकार अकोट फैल परिसरातील अकबर प्लॉटमध्ये घडला. त्यामध्ये आशा वर्कर यांना धक्काबुक्की करण्यात आली. ताजनापेठ परिसरातील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर व परिसरातील रहिवाशांचा पूर्वानुभव लक्षात घेता अशा भागांमध्ये मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी स्वत: जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांच्या या निर्णयामुळे प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य तपासणीसाठी जाणाºया महापालिकेच्या पथकातील कर्मचाºयांना बळ मिळत असल्याची भावना अनेक कर्मचाºयांनी व्यक्त केली.

नगरसेवक फिरकलेच नाहीत!नाला सफाई असो वा प्रभागांमधील अंतर्गत रस्त्याची झाडपूस किंवा इतर कोणत्याही किरकोळ कारणांसाठी धाऊन जाणारे नगरसेवक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये फिरकतही नसल्याची या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक ११ मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर संबंधित नगरसेवकांनी साधी विचारपूसही केली नसल्याची नाराजी स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत.आम्ही तुमच्यासाठीच; सहकार्य करा!कोरोना विषाणूची लागण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होते. एकाच ठिकाणी उभे राहून घोळक्याने चर्चा केल्यानेही कोरोनाचा संसर्ग होतो. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या परिसरात या संसर्गाचा धोका लक्षात घेता त्या भागातील नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठीच आहोत, आम्हाला सहकार्य करा, असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका