शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बहूद्देशीय संस्था हडपली; धर्मादाय आयुक्ताकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:02 IST

अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था हडपल्याच्या प्रकरणात लोकमतच्या वृत्तानंतर प्रचंड खळबळ माजली. या वृत्ताची दखल घेत सहायक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. हा चौकशी अहवाल लवकरच अमरावती येथे सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्तानंतर खळबळमृत्यू प्रमाणपत्र व स्वाक्षर्‍यांची तपासणी करा

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था हडपल्याच्या प्रकरणात लोकमतच्या वृत्तानंतर प्रचंड खळबळ माजली. या वृत्ताची दखल घेत सहायक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. हा चौकशी अहवाल लवकरच अमरावती येथे सादर करण्यात येणार आहे. आदर्श कॉलनीतील रहिवासी दामोदर कोंडाजी इंगळे यांनी त्यांच्या १५ सहकार्‍यांसह १९९0 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान रजिस्टर्ड क्रमांक २२५६/एकेएल ही संस्था अकोल्यात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केली होती; मात्र त्यानंतर ही संस्था सोलापूर, सांगली व मुंबई येथील रहिवासी असलेल्या १५ जणांनी अकोल्यातील सभासदांच्या बनावट स्वाक्षरी करून परस्पर ‘चेंज रिपोर्ट’ अकोला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून बळकावली. सदर संस्थेचे सोलापूर येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेच्या गांधी नगर व्हीएचबी कॉलनी येथील कार्यालयात नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संस्था बळकावल्याचे निर्दशनास येताच संस्थापक सभासदांना धक्का बसला. ज्या १५ लोकांनी ही संस्था बळकावली त्यामधील एकही व्यक्ती परिचित नसल्याने संस्थापक सभासदांनी या प्रकरणी सह धर्मादाय आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले आहे. या अपिलानंतर सोलापूर, सांगली व मुंबईतील सभासदांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली; मात्र गत तीन तारखांपासून या तीनही जिल्हय़ातील सभासद उपस्थित राहत नसल्याचे समोर आले आहे. या संस्थेचे मूळ प्रमाणपत्र व दस्तावेज हे अकोल्यातील संस्थापक व संचालकांकडेच असताना हा घोळ घालण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सह धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानंतर सहायक धर्मादाय आयुक्त अकोला यांनी सुरू केली असून, त्याचा अहवाल तातडीने अमरावती येथे सादर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा