शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड; आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:49 IST

अकोला: स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यास नकार देणाºया मिनी ट्रक चालकावर सुद्धा धारदार गुप्तीने वार करून त्याची हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप आणि १0 हजार रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देअकोल्याचे चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप आणि १0 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.२३ डिसेंबर २0१३ रोजी चिखलगाव येथील बसस्टँडवर घडले होते हत्याकांड.आई व मित्रावर हल्ला प्रकरणात सुद्धा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित कलम ३0७ मध्ये ७ वर्षाचा सश्रम कारावास.

अकोला: स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यास नकार देणाºया मिनी ट्रक चालकावर सुद्धा धारदार गुप्तीने वार करून त्याची हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप आणि १0 हजार रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.मनोज पेंढारकर याने पातूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ मुकेश मधुकर पेंढारकर(२६) हा मिनी ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. सात महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. २३ डिसेंबर २0१३ रोजी चिखलगाव येथील बसस्टँडवर मुकेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळाली. मुकेश हा त्याच्या मिनी ट्रकमध्ये महावितरणचे काही साहित्य घेवून अकोल्याला जात होता. दरम्यान आरोपी गोपाल सरप याने त्याच्या जखमी आईला रूग्णालयात नेण्यासाठी मुकेशला विनवणी केली. परंतु मुकेशने त्याला नकार दिल्यामुळे संतप्त गोपालने त्याच्यावर गुप्तीने हल्ला केला. जखमी अवस्थेतच मुकेश पेंढारकर याला सर्वोपचार रूग्णालयात भरती केले. परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणात मनोज पेंढारकर याने पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गोपाल सरप याच्याविरूद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तपासामध्ये आरोपी गोपालने मुकेशची हत्या करण्यापूर्वी स्वत:ची आई सुनंदा सरप आणि मित्र विलास पांडूरंग वानखडे यांच्यावरही गुप्तीने वार करून त्यांना जखमी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून गुप्ती जप्त केली आणि भादंवि कलम ३0७, ३0४, आर्म अ‍ॅक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल करून गोपालला अटक केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने १९ साक्षीदार तपासले. चार साक्षीदार फितूर झाले. आरोपी गोपाल सरप याच्याविरूद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आई व मित्रावर हल्ला प्रकरणात सुद्धा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित कलम ३0७ मध्ये ७ वर्षाचा सश्रम कारावास, पाच हजार रूपये दंड, न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास आणि कलम ३२४ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंड, न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी विधिज्ञ मंगला ए. पांडे यांनी बाजु मांडली. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCourtन्यायालयCrimeगुन्हा