अकोला : यावर्षी पावसाला दोन महिने विलंब झाल्याने राज्यातील मूग या कडधान्य पिकाचे क्षेत्र घटले असून, उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मुगाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने यावर्षी मुगाचे भाव ६,२00 रुपये प्रतिक्विंटलपर्यंंत पोहोचले आहेत. यापुढे हे भाव वाढण्याची शक्य ता वर्तविण्यात येत आहे. देशात महाराष्ट्र मुगाचे प्रमुख उत्पादक राज्य असून, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात खरीप हंगामात तर तामीळनाडू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात उन्हाळ्य़ात मुगाची लागवड केली जाते. मूग हे कोरडवाहू पीक असल्याने महाराष्ट्रात मुगाची पेरणी जून महिन्यात तर तोडणी ऑगस्ट महिन्यात केली जाते. अल्प कालावधीचे हे नगदी पीक आहे; परंतु पावसाअभावी राज्यातील मुगाचे क्षेत्र घटले आहे. ज्या शेतकर्यांनी अल्प पावसात पेरणी केली, त्यांना एकरी एक क्विंटलपेक्षा कमी उत्पादन झाले. त्यामुळे यावर्षी बाजारात मुगाची आवक घटली आहे. महाराष्ट्र देशात मुगाचे प्रमुख उत्पादक राज्य असून, अकोला, लातूर, अमरावती आणि जळगाव हे प्रमुख व्यापारी केंद्र आहेत. विदर्भात मुगाची पेरणी जून महिन्यात तर काढणी ऑगस्ट महिन्यात होत असल्याने सप्टेंबर महिन्यात बाजारात मुगाची आवक चालू होते. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागांतर्गत कार्यरत एनसीएपी कृषी वि पणन माहिती केंद्राने लातूर बाजारपेठेतील मागील सोळा वर्षांंतील मुगाच्या मासिक सरासरी किमतीचे पृथ्थकरण केले असून, या अभ्यासाच्या निष्क र्षानुसार बाजारातील चालू स्थिती कायम वेगवेगळ्य़ा प्रतिवारीनुसार सप्टेबर-ऑक्टोबर २0१४ या महिन्यात मुगाची सरासरी किंमत ६,१00 ते ६,२00 क्विंटल राहणार असल्याचे कृषी विपणन केंद्राने म्हटले आहे.
राज्यात मुगाला मिळणार ६,२00 प्रतिक्विंटल भाव!
By admin | Updated: October 6, 2014 01:35 IST