शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

‘एमटीडीसी’कडे २१९ कोटींचे अनुदान पडून!

By admin | Updated: April 12, 2017 00:33 IST

अकोला- केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले २१९ कोटींचे अनुदान राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे पडून असल्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याचे ‘कॅग’ने अहवालात नमूद केले आहे.

पर्यटनाला खो; ‘कॅग’चा अहवालअकोला: राज्यात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले २१९ कोटींचे अनुदान राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे (एमटीडीसी)पडून असल्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याचे ‘कॅग’ने अहवालात नमूद केले आहे. पर्यटकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात ‘एमटीडीसी’ची कार्यप्रणाली अपयशी ठरल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे.राज्यात पर्यटनाला मोठा वाव असून, विविध भागात घनदाट जंगल आहेत. या व्यतिरिक्त राज्याच्या कानाकोपऱ्यात थंड हवेच्या ठिकाणांची संख्या जास्त असून तीर्थस्थळे, पुरातन लेणी, कोकण किनारपट्टीसह मुंबई किनारपट्टी लाभली आहे. बाराही महिने साजरे होणारे सण, कला संस्कृती अशा विविधतेने नटलेल्या राज्यात पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. राज्यात पर्यटनवाढीला पोषक स्थिती असताना पर्यटकांना आकर्षित करण्यात एमटीडीसी अपयशी ठरल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एमटीडीसीच्या अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त २१९ कोटींचे अनुदान अखर्चित राहिले आहे. महामंडळाच्या कारभारामुळे पर्यटन व्यवसायात गोवा, गुजरात राज्यांनी महाराष्ट्राला पिछाडीवर टाकले आहे. पर्यटकांच्या संख्येत घटघनदाट जंगले, थंड हवेची ठिकाणे, किल्ले, समुद्र किनारे, तीर्थस्थाने अशा विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यात एमटीडीसीची यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. राज्यात पर्यटकांचे प्रमाण ११.१३ असून गुजरातमध्ये १७.६८ तर गोव्यात ३२.५० आहे.चिखलदऱ्यात १७ कोटींची उधळपट्टी !विदर्भासह राज्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चिखलदरा येथे दरवर्षी पर्यटकांची मोठी संख्या राहते. या ठिकाणी एमटीडीसीने भाडेतत्त्वावर पर्यटन संकुल दिले असले तरी पर्यटकांसाठी ते तातडीने उपलब्ध होत नाही. शिवाय संबंधित कंत्राटदारास नियमबाह्यपणे १७ कोटी ३६ लाखांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याचे अहवालात ‘कॅग’ने नमूद केले आहे.