शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

 सेवा स्मार्ट होण्याआधीच ‘एमएसआरटीसी’चे सर्व्हर डाउन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 15:30 IST

अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी पासची सेवा स्मार्ट होण्याआधीच अडचणीत सापडली आहे.

- संजय खांडेकरअकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी पासची सेवा स्मार्ट होण्याआधीच अडचणीत सापडली आहे. गत तीन दिवसांपासून ‘एमएसआरटीसी’चे सर्व्हर डाउन असल्याने राज्यातील शेकडो प्रवाशांसह विविध प्रकारच्या पासधारकांना त्याचा फटका सोसावा लागत आहे.एसटी महामंडळाने यंदाच्या आर्थिक वर्षापासून अनेक सेवा स्मार्ट करण्यास करण्यास सुरुवात केली आहे. नियोजित प्रवास, शैक्षणिक सवलत, ज्येष्ठ नागरिक, शारीरिक दिव्यांग, माजी सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि माजी कर्मचारी आदींना विविध प्रकारच्या सवलती पासेस दरवर्षी दिल्या जातात. या पासेसची संपूर्ण माहिती विभागीय कार्यालयात नोंदविलेली असायची. त्यासंबंधीची यादी मुंबईच्या मुख्य कार्यालयास पाठविली जात असे; मात्र परिवहन मंत्रालयाने यंदापासून या सर्व नोंदी आॅनलाइन करीत प्रत्येक पासधारकास स्मार्ट कार्ड देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला; मात्र ही स्मार्ट सेवा पुरविण्यासाठी लागणारे सक्षम सर्व्हर अद्याप महामंडळाकडे नाही. ही सेवा स्मार्ट होण्याआधीच अडचणीत आली आहे. गत तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याने राज्यभरातील शेकडो प्रवासी आणि पासधारक एसटी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.अशी होते  आॅनलाइन नोंदनवीन स्मार्ट कार्डसाठी प्रत्येक पासधारकांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, आणि ५१ रुपयांचे शुल्क भरावे लागते. त्यानंतर एसटीच्या विभागीय कार्यालयातून पासधारकाची व्यक्तिगत माहिती आॅनलाइन अपलोड करावी लागते. याच ठिकाणी आॅनलाइन फोटो घेतला जातो. त्यानंतर मुंबईहून स्मार्ट कार्ड तयार होऊन येणार आहे; मात्र सर्व्हर डाउन असल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीonlineऑनलाइन