शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'एमएसआरटीसी' सरळ सेवा भरतीच्या पोर्टल वर अर्ज अपलोड होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:28 IST

अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकाच्या सरळ सेवा भरतीचे पोर्टलवर गत तीन दिवसांपासून अर्ज अपलोड होत नसल्याने शेकडो उमेदवारांचा हिरमोड होत आहे.

- संजय खांडेकरअकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकाच्या सरळ सेवा भरतीचे पोर्टलवर गत तीन दिवसांपासून अर्ज अपलोड होत नसल्याने शेकडो उमेदवारांचा हिरमोड होत आहे. नोकर भरतीच्या आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत देवनागरी लिपी कंपोज करण्याची अट आहे; मात्र देवनागरी लिपी कंपोज होत नसून, ४०१ एक्सेस डीनाय असा संदेश देत उमेदवारांचा अर्ज फेटाळला जात आहे. आॅनलाइन नोकरभरतीत येत असलेल्या या एररमुळे उमेदवार चिंतेत पडले आहे. एमएसआरटीसीच्या वरिष्ठांनी तातडीने ही समस्या लक्षात घेऊन पर्याय खुले करावेत, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक आणि वाहकच्या ४,४१६ पदांची सरळ सेवा भरती होत आहे. त्यासाठी १७ जानेवारीपासून ८ फेब्रुवारी १९ पर्यंत आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उमेदवार आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सायबर कॅफे आणि संगणकीय सेवा देणाऱ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहे; मात्र त्यांचे अर्ज पोर्टल घेईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. एमएसआरटीसीच्या पोर्टलवर अनेक नव्या तांत्रिक समस्या उद्भवत असून, त्यामुळे उमेदवार आणि सायबर कॅफेचे संचालक कमालीचे त्रासले आहे. आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत आधी फोटो अपलोड करायचा असतो; मात्र बराच वेळ या साइटवर उमेदवाराचा फोटो अपलोड होत नाही. कसाबसा फोटो अपलोड झाला तर त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण होत नाही. इंग्रजीसह मराठी/देवनागरी लिपीत नाव लिहिण्याची सक्ती पोर्टलवर करण्यात आली आहे. इंग्रजीत नाव स्वीकारले जाते; मात्र मराठी-देवनागरी लिपी काही केल्याने कंपोज होत नाही. दिलेल्या सूचनेप्रमाणे वाय दाबूनही लिहिल्या जात नाही. कॉपीपेस्ट करूनही रकाण्यामध्ये मराठी येत नसल्याने उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी समोर येत आहे. एमएसआरटीसीचे सरळ सेवा भरतीचे पोर्टल तीन दिवसांपासून अर्ज घेत नसल्याने उमेदवार हतबल झाले आहे. एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

गेल्या तीन दिवसांपासून शेकडो उमेदवारांच्या आॅनलाइन अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचण येत आहे. पोर्टलवर मराठी लिपी लिहिल्या जात नाही. त्यामुळे अर्ज फेटाळल्या जात आहे.- अनिल मानकर, सायबर कॅफे संचालक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ