शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण ‘त्या’ वीज ग्राहकांना सेवा जोडणी शुल्काचा पर तावा देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:46 IST

अकोला : महावितरणने २0 जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल  २00७ या कालावधीत वीज ग्राहकांकडून सेवा जोडणी आकार  (सर्व्हिस लाइन चार्ज) व मीटर आकारापोटी वसूल केलेली र क्कम संबंधित ग्राहकांना सव्याज परत करण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीज देयकात समायोजित  करून मिळणार असल्याचे महावितरणने जारी केलेल्या पत्रकात  म्हटले आहे.

ठळक मुद्देदेयकात होणार समायोजन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काढले परिपत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणने २0 जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल  २00७ या कालावधीत वीज ग्राहकांकडून सेवा जोडणी आकार  (सर्व्हिस लाइन चार्ज) व मीटर आकारापोटी वसूल केलेली र क्कम संबंधित ग्राहकांना सव्याज परत करण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीज देयकात समायोजित  करून मिळणार असल्याचे महावितरणने जारी केलेल्या पत्रकात  म्हटले आहे.नवीन वीज जोडणी देताना महावितरण कंपनीने खांब व नवीन  तारा टाकण्यासाठी तसेच खांबापासून मीटरपयर्ंत तारा जोडणे  आणि मीटर देणे, यासाठी वीज ग्राहकांकडून घेतले होते. या  वीज ग्राहकांना व्याजासह त्यांची रक्कम परत करण्याचा आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर महावितरणने परतावा  देण्याचे परिपत्रक जारी केले आहे. नवीन जोडणी देण्यासाठी विजेचे खांब व तारा टाकावयाच्या  असतील, तर त्याचा खर्च ओआरसी किंवा ओआरसीपी या  नावाखाली संबंधित वीज ग्राहकांकडून जानेवारी २00५ पासून  आकारला जात असे. तसेच सप्टेंबर २00६ नंतर नवीन जोडणी  देण्यासाठी खांबापासून मीटरपयर्ंत तार टाकण्यासाठी (सर्व्हिस  लाइन चार्ज) व मीटरची किंमत महावितरणने घेतली होती.  याच्याविरोधात वीज कायद्यान्वये ऊर्जा नियामक आयोगाकडे  तक्रार दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र वीज ग्राहक  संघटनेने दाखल केलेल्या या तक्रारीवर सुनावणी होऊन १७ मे  २00७ व २१ ऑगस्ट २00७ रोजीच्या निकालाप्रमाणे सर्व  वीज ग्राहकांना व्याजासह पूर्ण रक्कम परत करावी, असे आदेश  ऊर्जा नियामक आयोगाने महावितरणला दिले होते. मात्र,  महावितरणने याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागि तली. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा वीज ग्राहकांच्याच बाजूने निर्णय  दिला. म्हणजे ऊर्जा नियामक आयोगाचा निकाल कायम ठेवला.  ही न्यायालयीन लढाई वीज ग्राहक संघटनेने तब्बल दहा वर्षे  लढली.आता महावितरण कंपनीने एक परिपत्रक जारी केले आहे. २0  जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल २00७ या कालावधीमध्ये  नव्याने जोडणी दिलेल्या ज्या ग्राहकांकडून ओआरसी किंवा  ओआरसीपी, तसेच एसएलसी व मीटरची किंमत घेतली आहे,  त्या ग्राहकांना हा परतावा द्यावा, असे या पत्रकात नमूद केले  आहे. राज्यातील अशा वीज ग्राहकांना सुमारे ९00 कोटी रुपये  परतावा मिळणार आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन