शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

महावितरणची नागपूर परिक्षेत्रात धडक मोहिम : सात जिल्ह्यात ८७ लाखांच्या वीजचोऱ्या, अनियमितता उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 6:57 PM

अकोला : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान विदर्भात सर्वत्र राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधातील विशेष मोहीमेत ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीजचोऱ्या   उघडकीस आल्या.

ठळक मुद्देअकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या सातही जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या.तर २१ लाख ३६ हजार २२१ रुपये मुल्यांकनाच्या ८० प्रकरणांत इतर अनियमितता आढळून आल्या आहेत.

अकोला : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान विदर्भात सर्वत्र राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधातील विशेष मोहीमेत ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीजचोऱ्या   उघडकीस आल्या. तर २१ लाख ३६ हजार २२१ रुपये मुल्यांकनाच्या ८० प्रकरणांत इतर अनियमितता आढळून आल्या आहेत.सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फ़े महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या सातही जिल्ह्यात ४ ते ६ जानेवारी दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत महावितरणची राज्यभरातील ३० मंडलांतील भरारी पथकांचा सहभाग होता. महावितरणचे कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अरविंद साळवे, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत आणि उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) मंगेश वैद्य यांच्या मारदर्शनात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहीमेत सातही जिल्ह्यातील ४०१ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९७ ठिकाणी थेट वीजचोरी, तर ८० ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळून आल्या. या दोन्हीचे मुल्यांकन तब्बल ८७ लाख ६८ हजार ६४३ रुपये आहे. उघडकीस आलेल्या एकूण १७७ प्रकरणांत तब्बल ९ लाख ८७ हजार ६९ युनिट्सची वीजचोरी झाल्याचे अनुमानित आहे.अनियमिततीची सर्वाधिक ३७ प्रकरणे वाशिम जिल्ह्यातीलया मोहीमेत वीजचोरी आणि वीज वापरातील अनियमिततीची सर्वाधिक ३७ प्रकरणे वाशिम जिल्ह्यातील असून, त्याखालोखाल नागपूरची ३६, अकोला २९, अमरावती २६, बुलढाणा २३, यवतमाळ २१ आणि वर्धा जिल्ह्यातील १३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. याशिवाय थेट वीजचोरीच्या ९७ प्रकरणांपैकी सर्वाधिक १९ नागपूर जिल्ह्यातील असून त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील १८, बुलढाणा जिल्ह्यातील १५, अकोला जिल्ह्यातील १४, वाशिम जिल्ह्यातील १३ तर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी ९ वीजचोºयांचा समावेश आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण