शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

खासदार संजय धोत्रे करणार जिनेव्हा येथील ई-संसद परिषदेत भारताचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 18:19 IST

अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे स्वित्झर्लंड देशातील जिनेव्हा येथे ३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होऊ घातलेल्या ८ व्या जागतिक ई-संसद परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत.

ठळक मुद्दे भारताकडून प्रतिनिधित्व करणारे खा. संजय धोत्रे हे लोकसभेमधून एकमेव खासदार प्रतिनिधीत्व करणार आहेत. या जागतिक परिषदेला सुमारे ११० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी खासदार धोत्रे जिनिव्हाला रवाना झाले आहेत.

अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे स्वित्झर्लंड देशातील जिनेव्हा येथे ३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होऊ घातलेल्या ८ व्या जागतिक ई-संसद परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी खासदार धोत्रे जिनिव्हाला रवाना झाले आहेत.जिनेव्हा येथील इंटर पार्लमेंटरी युनियन तर्फे ‘सोशल मिडिया टेक्नॉलॉजी’या विषयावर आयोजित या जागतिक परिषदेला सुमारे ११० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भारताकडून प्रतिनिधित्व करणारे खा. संजय धोत्रे हे लोकसभेमधून एकमेव खासदार प्रतिनिधीत्व करणार आहेत. संसदीय प्रक्रियेच्या परीवर्तनामध्ये नव-नाविण्यता कशी आवश्यक आहे, संसदीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर, ई-संसद विकास, या वर जागतिक स्तरावर खल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, सांस्कृतिक बदल आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान हे उत्प्रेरक ठरत असल्याने त्याची महती वाढली आहे. या पार्श्वभूमीवरच सदर ई-संसद परिषद २०१८ मध्ये ‘इनोव्हेशन-२०१८’ हा विषय घेऊनच या परिषदेत सर्वांगानी चर्चा होणार आहे. सदर जागतिक परिषदेत मुख्यत्वे संसद आणि संसदेत तांत्रिक नव कल्पनांच्या प्रभावावर चर्चा केंद्रित होणार आहे.या परिषदेत जागतिक धोरणाची आखणी होणार असल्याने हा मानवी विकासामध्ये एक क्रांती घडवणारा मैलाचा दगड ठरणार असल्याने भविष्याच्या दृस्तीकोनातून याला अनन्य साधारण महत्व आहे. खा. संजय धोत्रे हे यांत्रिकी अभियंता तसेच विधिज्ञ असून प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी, ग्रामीण भागातील तळागाळापासून ते शहरी विकासापर्यंत, एक उद्यमशील तसेच एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने या जागतिक परिषदेमध्ये भारताची भूमिका अभ्यासपूर्ण रितेने मांडणार आहेत.पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प डिजिटल इंडिया याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद चे उपाध्यक्ष खा. संजय धोत्रे यांना महत्वपूर्ण जबाबदारी सोपविल्यामुळे हा अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांच्या १८ लाख मतदारांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेSwitzerlandस्वित्झर्लंडBJPभाजपा