शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीहून किसान रेल्वे सुरू करण्यासाठी हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:08 IST

अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे.

अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास जलद गतीने परराज्यात विक्रीसाठी पाठविता यावे, या उद्देशाने देशातील पहिली किसान विशेष रेल्वे नाशिक येथून सुरू झाल्यानंतर, आता अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही या रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे. अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करावी, या मागणीसाठी पश्चिम विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्यामागची भूमिका विषद केल्याची माहिती अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथील पत्रकार परिषदेत दिली.अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये संत्री, केळी, सीताफळ, पपई या फळांसह कापूस, हरभरा, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. याशिवाय गोड पाण्यातील मासे, दूध, पालेभाज्या, रानभाज्या, पान या नाशवंत मालांचेही मोठे उत्पादन होते. शेतकºयांनी उत्पादित केलेल्या या मालाची वाहतूक जलद गतीने बाजारपेठेपर्यंत व्हावी, यासाठी विभागातून किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुलभ व स्वस्त वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे शेतकरी नाशवंत मालाचे उत्पादन करण्यास धजावत नाहीत. रेल्वेद्वारे वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात या मालाचे उत्पादन घेतील. पर्यायाने पश्चिम विदर्भातील शेतकºयांचे जीवनमान उंचावेल, यासाठी अमरावती विभागाचे मुख्यालय असलेल्या अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता, त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वेराज्यमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, असे दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले. गडकरी यांच्या निर्देशानुसार ही रेल्वे सुरू करण्यासाठी अमरावती विभागातील सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करण्याच्या उद्देशाने विदर्भ विकास समितीचे पदाधिकारी पाचही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सर्व काही सुरळीत झाले, तर आगामी प्रजासत्ताकदिनी अमरावती येथून किसान रेल्वे सुरू होईल, अशी आशा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला समितीचे संयोजक नितीन भुतडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :railwayरेल्वेAkolaअकोलाAmravatiअमरावती